
बातमीदार : जीवन चव्हाण
चाळीसगाव (जि. जळगाव) : ट्रॅक्टरचा कर्ज भरण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणत विवाहितेला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील करगाव तांडा क्र. दोन येथे उघडकीला आली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात पतीसह सासरच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Married woman brutally beaten in Kargaon Crime against 5 persons Jalgaon Latest marathi news)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील करगाव तांडा क्र. २ येथील सासर असलेल्या जयश्री दिनेश राठोड (वय-२३) या विवाहितेला पतीसह सासरच्यांकडून २६ जुलै २०२० नंतर सुरुवातीचे चार महिने चांगली वागणूक मिळाली.
त्यानंतर पैशासाठी शाररिक व मानसिक छळ सुरु झाला. त्यात मंगळवार, ता. २ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास जयश्री हिला ट्रॅक्टरचा कर्ज भरण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये असे पतीसह सासरच्यांनी सांगितले. तिने नकार दिला.
त्याचाच राग येऊन सासू जिजाबाई जुगराज राठोड व जेठानी गुड्डीबाई वाल्मिक राठोड यांनी चापट बुक्यांनी मारहाण केली. व पती दिनेश जुगराज राठोड यांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जयश्री हिच्या तोंडात विषारी औषध घालण्याचा प्रयत्न केला.
तेव्हड्यात जयश्री हिने विरोध केल्यावर तिच्या पाठीमागून बरगडीवर जोराने बुक्का मारून बरगडीस दुखापत केली. तसेच सासरे जुगराज भावसिंग राठोड व जेठ वाल्मिक जुगराज राठोड यांनी शिवीगाळ करून हिला मारून टाका अशी धमकी दिली.
या वादात जयश्री दिनेश राठोड या विवाहितेला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी तिला खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर जयश्रीच्या जाबजबाबावरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात पती दिनेश जुगराज राठोड, सासरे जुगराज भावसिंग राठोड, सासू जिजाबाई जुगराज राठोड, जेठ वाल्मिक जुगराज राठोड व जेठानी गुड्डीबाई वाल्मिक राठोड सर्व रा. करगाव तांडा क्र. २ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि रमेश चव्हाण हे करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.