esakal | जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची सज्जता; ५९ ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित होणार
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Oxygen plant

जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची सज्जता

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव ः
कोरोना महामारीची (Corona epidemic) दुसरी लाट ओसरल्यात जमा असून, जिल्हा आरोग्य यंत्रणा(District Health System), जिल्हा प्रशासनाने (Corona third wave) तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी सुरू केली आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा अधिक जाणवला, बेडची संख्या कमी होती. तिसरी लाट आली, तर जिल्ह्यात तब्बल ५९ ठिकाणी ऑक्सिजन प्लांटनिर्मितीचे (Oxygen plant) कार्य सुरू आहे. त्यातील पाच ठिकाणचे ऑक्सिजन प्लांट सुरू झाले आहेत.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील धरणांत ५२ टक्के साठा; नद्या, नाले खळाळले


जिल्ह्यात सध्या जिल्हा कोविड रुग्णालय, भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ऑक्सिजननिर्मिती सुरू आहे. मोहाडी येथील रुग्णालयात दोन ऑक्सिजन प्लांट, जिल्हा रुग्णालयात एक, चाळीसगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, जामनेर, चोपडा, रावेर, भडगाव, अमळनेर, पारोळा, धरणगाव येथे ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीचे काम सुरू आहे. सर्व प्लांटमध्ये ऑक्सिजन निर्मितीची वेगवेगळी क्षमता आहे. ती एकत्र केली असता नऊ हजार ५०० ते दहा हजार सिलिंडर रोज भरतील एवढी ऑक्सिजननिर्मिती होणार आहे.

चाळीसगाव, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयांतील व मोहाडी येथील महिला रुग्णालयात अशा पाच ठिकाणचे प्लांट अगोदर कार्यान्वित होतील. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, ते प्लांट जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात येतील. त्यानंतर ऑक्सिजननिर्मितीसाठी लागणारा वीजपुरवठा, इतर कागदपत्रांची पूर्तता करणे सुरू आहे. आगामी १५ दिवसांत वीजपुरवठा जोडणी होणार आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होईल, अशी शक्यता आहे. आरोग्य यंत्रणेने त्यांच्याकडील पाच डॉक्टर, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील दहा, अशा १५ शासकीय बालरोगतज्ज्ञांना तिसऱ्या लाटेत उपचारासाठी बोलविण्याचे नियोजन आहे. सोबतच खासगी बालरोगतज्ज्ञांचीही मदत घेऊन दोन- तीन टीम कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा: कोरोनामुळे २२ लाख मुले शाळाबाह्य-आमदार डॉ. सुधीर तांबे


राज्य शासनाच्या सूचनेप्रमोण तिसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजन प्लांट उभारून ऑक्सिजननिर्मितीवर भर दिला आहे. पंधरा दिवसांत सर्वच ठिकाणी ऑक्सिजन प्लांटला लागणारा वीजपुरवठा जोडला जाणार आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन जनरेशन प्लांट २४, तर लिक्वीड ऑक्सिजन प्लांट १५ अशा एकूण ५९ प्लांटमधून ऑक्सिजन निमिती होईल. त्यातन १४० टन ऑक्सिजन निर्मिती होईल.
- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यकिचित्सक

loading image
go to top