esakal | अरे बापरे..सिव्हिलमध्ये आग ! नंतर सर्वांचा सुटकेचा निःश्‍वास
sakal

बोलून बातमी शोधा

fire

अरे बापरे..सिव्हिलमध्ये आग ! नंतर सर्वांचा सुटकेचा निःश्‍वास

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा परिसर. वेळ सकाळी साडेअकरा पावणेबाराची. आग लागल्याचे संदेश येताच सुरक्षा कर्मचारी आगीच्या दिशेने आग विझविण्यासाठी धाव घेतात. कोणी पाणी आणते, तर कोणी अग्निशमन यंत्र. रुग्णालयातील सर्वच जण धास्तावलेले... आता काय होणार... तेवढ्यात अग्निशमन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवत कर्मचाऱ्यांना हे आगीचे प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) होते, असे सांगितल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला.

हेही वाचा: तीन महिन्यापासून उसाच्या पेमेंटसाठी शेतकरी ताटकळत !

सध्या उन्हाळा सुरू आहे. आग कोठेही लागू शकते. त्यातल्या त्यात रुग्णालयातील आग म्हणून जीवघेणीच. आग लागली की तिच्यावर कशा प्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना करावयाची याचे प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) मंगळवारी (ता. २७) महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखविण्यात आले. या वेळी डॉक्टर, परिचारिका यांनी सक्रिय सहभाग घेत आग विझविण्याचे धडे गिरविले.

या वेळी प्रामुख्याने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. अरुण कसोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, डॉ. विलास मालकर, अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, सहाय्यक अधिकारी सुनील मोरे उपस्थित होते.

हेही वाचा: हनुमानाची मुर्ती चक्‍क लोण्याची..उन्हाळ्यातही नाही वितळत मुर्तीवरील लोणी

या वेळी अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, फायरमन अश्वजित घरडे, नितीन बारी, तेजस जोशी यांनी उपस्थित यंत्रणेला आगप्रतिबंधाची सविस्तर माहिती दिली. या वेळी उपस्थित डॉक्टर, परिचारिका, अधिकारी यांनी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात आगप्रतिबंधक टिप्स जाणून घेतल्या. विद्युत पॅनल बोर्डला आग लागली तर पाणी मारणे टाळा. झाडू मारल्याने आग विझू शकते. फायर ब्रिगेडच्या वाहनाला येण्यासाठी रस्ता मोकळा हवा, त्यासाठी अद्ययावत असलेल्या पार्किंगचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. डॉ. इम्रान पठाण, डॉ. इम्रान तेली, डॉ. चेतन भंगाळे, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. अलोक यादव, अधिसेविका कविता नेतकर, स्वच्छता निरीक्षक बापू बागलाणे, कर्मचारी ज्ञानेश्वर डहाके, समाजसेवी अधीक्षक संदीप बागूल, मंगेश बोरसे, अरुण हळदे यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, विद्यार्थी परिचारिका, अधिकारी, कक्षसेवक, कर्मचारी उपस्थित होते.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image