esakal | जामनेरमध्ये पोलिसांचा ‘आयपीएल’ सट्टावर धाड; १४ जणांवर गुन्हे !

बोलून बातमी शोधा

जामनेरमध्ये पोलिसांचा ‘आयपीएल’ सट्टावर धाड;  १४ जणांवर गुन्हे !
जामनेरमध्ये पोलिसांचा ‘आयपीएल’ सट्टावर धाड; १४ जणांवर गुन्हे !
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जामनेर : शहरातील पाचोरा रोडवरील श्रीरामनगर भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका घरात सुरू असलेल्या आयपीएल सट्टा- बेटिंगवर बुधवारी (ता. २८) रात्री छापा टाकून १४ संशयितांसह पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. शहरामध्ये आयपीएल सुरू झाल्यापासूनच त्यावर बिनधास्त सट्टा खेळला जात आहे. विशेष म्हणजे, यामध्ये सर्वसामान्यांसह उच्चभ्रू तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याने या ताज्या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: भुसावळ पालिकेत खडसे गटाचा वरचष्मा, प्रमोद नेमाडे बिनविरोध

श्रीरामनगर भागात आयपीएलवर सट्टा खेळला जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे पथकाने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत एकूण ८ दुचाकीसह ६३ हजार ६३० ची रोकड, वेगवेगळ्या कंपनीचे २७ मोबाईल, टीव्ही संच, संगणक-लॅपटॉप आदी साहित्यासह एकूण ५ लाख ३० हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

हेही वाचा: जि.प.अध्यक्षांचे पतीसह स्पेशल लसीकरण ! आणि भाजप कार्यकर्त्यांचा घरचा आहेर

या कारवाईत मुख्य सुत्रधारासह अशोक उखर्डू हिवराळे, अक्षय प्रताप पाटील, विकास सुरेश माळी, अजय विठ्ठल माळी, शुभम संजय पाटील, संदीप देविदास खडके, सतीश लक्ष्मण माळी, जहीर खान हनीफ खान, भूषण सुरेश कवळकर, किरण अनिल जाधव, धनराज प्रल्हाद साबळे, उमेश दिलीप जगताप (सर्व रा. जामनेर), अमन सुधाकर दळे (रा. टाकळी), सचिन हिलाल धनगर (शिंगाईत) अशा १४ जणांविरोधात गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील नाईक यांच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी विनोद पाटील तपास करीत आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे