अबब! जळगाव शहातून पहिल्या दिवशी ३०८ टन कचरा केला संकलित 

सचिन जोशी
Tuesday, 19 January 2021

जळगाव शहराच्या साफसफाईसाठी ८०० कर्मचारी आहेत. दररोज १०० कर्मचारी जरी सुटीवर असले तरीही योग्यप्रकारे साफसफाई होऊ शकते.

जळगाव : महापौरांच्या आदेशान्वये सोमवारपासून शहरात स्वच्छता अभियानास सुरवात झाली. पहिल्याच दिवशी तीनशे टन कचरा संकलित करण्यात आला. 

शिवाजीनगरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभियानाला सुरवात करण्यात आली. या वेळी स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, पाणीपुरवठा सभापती अमित काळे, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, अन्य सदस्य व अधिकारी उपस्थित होते. 

हजेरीबाबत आयुक्तांच्या सूचना 
जळगाव शहराच्या साफसफाईसाठी ८०० कर्मचारी आहेत. दररोज १०० कर्मचारी जरी सुटीवर असले तरीही योग्यप्रकारे साफसफाई होऊ शकते. अधिकाऱ्यांनी आणि आरोग्य निरीक्षकांनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांवर वचक ठेवून काम करून घेतल्यास कुणाचीही ओरड राहणार नाही. प्रत्येक अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांवर वचक ठेवावा, अशा सूचना आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिल्या. 

 आवश्य वाचा-  पैशांसाठी तरुणाचे अपहरण; मग काय, व्हाॅटसअप लोकेशनद्वारे पोलिसांचा सिनेस्टाईल शोध सुरू

 

एलईडी लवकर बसवा 
शिवाजीनगर परिसरात जवळपास ७५० खांब असून, त्यावर एलईडी बसविण्यात आले नसल्याची माहिती नागरिकांनी दिली. महापौर भारती सोनवणे यांनी लागलीच विद्युत विभागाला सूचना देत काम सुरू करण्याचे सांगितले. गुरुवारपासून कामाला प्रत्यक्षात सुरवात करण्यात येऊन दोन दिवसांत काम पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच हरिओमनगरात देखील एलईडी बसविले नसल्याची तक्रार नगरसेवकांनी मांडली असता, महापौरांनी सूचना दिल्या. 

गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस 
स्वच्छता अभियान राबविणार असल्याने गैरहजर राहू नये, याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. सोमवारी मनपाच्या ४७५ कायम कर्मचाऱ्यांपैकी ४०३, तर मक्तेदाराचे ४०० पैकी ३३७ कर्मचारी हजर होते. मनपाच्या ५४ गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, तर मक्तेदाराच्या ६३ गैरहजर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला आहे. 

३०८ टन कचरा 
सोमवारी ८७५ पैकी ७४० कर्मचारी हजर, तर १३५ गैरहजर होते. त्यात १८ वैद्यकीय व अग्रीम रजेवर होते. सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत शहरातून ३०८ टन कचरा संकलित करण्यात आला. एरवी दररोज सरासरी २७० टन कचरा संकलित केला जातो. प्रभाग एक ते सहामधून तब्बल ३८ टन अतिरिक्त कचरा संकलित करण्यात आला. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mayer marathi news jalgaon sanitation campaign city three hundred tons garbage collection