Jalgaon News : आमची विकासपेरणी डिसेंबरमध्ये दिसेलच; महापौर उपमहापौर यांचा कार्यकाळ संपल्याने निरोप

Mayor Deputy Mayor statement about Our development will be visible in December jalgaon news
Mayor Deputy Mayor statement about Our development will be visible in December jalgaon newsesakal

Jalgaon News : महापालिकेत महापौर, उपमहापौर म्हणून आम्ही अडीच वर्षाच्या काळात जळगाव शहराच्या सर्वसामान्य जनतेसाठी विकासाचे कार्य केले आहे. या काळात आम्ही विकासची पेरणी केली आहे. येत्या डिसेंबरमध्ये ते दिसून येईल, असे मत महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी शनिवारी (ता. १६) व्यक्त केले.

महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकपदाचा कार्यकाळ संपल्याने शनिवारी पदाधिकाऱ्यांनी सतरा मजली इमारतीच्या पायरीला नमस्कार करून निरोप घेतला. या वेळी महापौर व उपमहापौर भावनिक झाले होते.

महापौरांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेस महापौर सौ. महाजन, उपमहपौर श्री. पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन उपस्थित होते. (Mayor Deputy Mayor statement about Our development will be visible in December jalgaon news)

महापौर महाजन म्हणाल्या कि, गेल्या अडीच वर्षाच्या काळात आम्ही अनेक चांगली कामे करण्याचा धाडसी निर्णय घेतला. शहराच्या सर्वागिण विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. तरीही विकासाचा अनुषेश इतक्या लवकर भरून काढणे शक्य नाही. मात्र, आम्ही विकासाची पेरणी केली आहे. कामे सुरू करण्यात आली आहेत.

येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत कामे झाल्यानंतर जळगावकरांना विकास दिसून येईल. आम्ही पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्‍वारूढ पुतळा बसविला. महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा बसवून त्याचेही अनावरण करण्यात आले आहे.

नागरी हिताची कामे केली

शहरात नागरी हिताची कामे केली आहेत. तीनशे स्वेअर फुटापर्यंत रहिवासी मालमत्तांची घरपट्‌टी माफ करण्याचा निर्णय घेतला. महिलांना घरपट्टीत पाच टक्के सवलत दिली. सिडकोच्या माध्यमातून अनेक गरजवंतांना घरे दिली. महापालिका कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर करून आणला.

मोहाडी रस्त्यावरील उद्यानास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले. दिवंगत समाजसेवक डॉ. अविनाश आचार्य व गफ्फार मलीक, तसेच विशेष सरकारी वकील उज्वल निकम आणि जळगावच्या शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे नंदकुमार बेंडाळे यांना ‘जळगाव रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कविवर्य ना. धों. महानोर यांचे स्मारक करण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mayor Deputy Mayor statement about Our development will be visible in December jalgaon news
Ganeshotsav 2023 : पोलीसांनाही आनंदात सहभागी होऊ द्या..! गणेशमंडळ कार्यकर्त्यांना ‘एसपीं’ची भावनीक साद

सर्वाना सोबत घेवून कार्य

महापौर महाजन म्हणाल्या कि, आम्ही विकासात राजकारण कधीही केले नाही. सर्वाना सोबत घेवून कार्य केले आहे. मला महापालिकेत सर्व नगरसेवकांचे सहकार्य मिळाले. उपमहपाौर कुलभूषण पाटील यांचेही सहकार्य मिळाले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, संजय सावंत, सुरेशदादा जैन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, एकनाथ खडसे, नितीन लढ्ढा यांनी मला आशिर्वाद दिला. जनतेनेही आपल्याला सहकार्य केले.

अडीच वर्षे विकासासाठी कार्य : पाटील

उपहापौर पाटील म्हणाले, की अडीच वर्षात आम्ही समन्वयाने शहराच्या विकासाची कामे केली. कोणतेही राजकारण न करता जनतेच्या हिताची कामे केली. विकासाचे सर्व ठराव मंजूर केले आहेत. लवकरच जळगावकरांना तो दिसून येईल. महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनीही महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमेला, तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदभार सोडला.

विधानसभेसाठी पक्षप्रमुखाचा आदेश

विधानसभा निवडणूक लढविण्याच्या चर्चेबाबत जयश्री महाजन म्हणाल्या, की शिवसेनेत पक्षाची पद्धत वेगळी आहे. प्रत्येक शिवसैनिक पदास लायक असतो, कारण त्याच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. आमच्या पक्षात विधानसभा निवडणूकीसाठी पक्षप्रमुख जो आदेश देतील, ते आपण मान्य करणार आहोत. तेच सुत्र आगामी काळात विधानसभेसाठी असणार आहे. पक्षप्रमुख ज्यांना उमेदवारी देतील, तोच आमचा उमेदवार असेल. पक्षादेश महत्वाचा असतो.

Mayor Deputy Mayor statement about Our development will be visible in December jalgaon news
ABHA Card : आयुष्मान कार्डाचे उद्दिष्ट गाठणार : ‘सीईओ’ अंकित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com