Jalgaon News : वाघुरदे नगरातील निकृष्ट कामाची चौकशी करणार : महापौर जयश्री महाजन| Mayor Jayshree Mahajan assured an inquiry will be conducted into poor road work in Waghurde jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Road construction inferiority

Jalgaon News : वाघुरदे नगरातील निकृष्ट कामाची चौकशी करणार : महापौर जयश्री महाजन

Jalgaon News : शहरातील वाघुरदे नगरातील रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही महापौर जयश्री महाजन यांनी दिली. (Mayor Jayshree Mahajan assured an inquiry will be conducted into poor road work in Waghurde jalgaon news)

महापौर जयश्री महाजन यांनी आज मुक्ताईनगरच्या मागील भागात असलेल्या वाघुरदे नगर भागाला आज भेट देवून त्या ठिकाणच्या समस्यांची माहिती घेतली.

या वेळी परिसरातील नागरिकांनी समस्या मांडल्या, या भागात नुकतेच झालेले रस्त्याचे काम निकृष्ट असल्याची तक्रार नागरिकांनी केली, त्यावर महापौर महाजन यांनी सांगितले की, आपण मला रस्त्याच्या कामाबाबत लेखी तक्रार द्या, मी तातडीने त्याची चौकशी लावून संबधित मक्तेदारावर कारवाई करण्याबाबत आदेश देईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यावेळी नागरिकांनी गेल्या तीस वर्षापासून या भागात गटारी झाल्या नसल्याच्या तक्रारी केल्या तसेच साफसफाई करणारे कर्मचारी आठवड्यातून दोनच वेळा येत असल्याच्या तक्रारी केल्या.

या वेळी महापौरांनी सर्व लोकांच्या तक्रार ऐकूण घेतल्या, या वेळी त्यांच्या समवेत शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे होते, महापौरांनी सोनगिरे यांना याभागातील कामाबाबत सूचना केल्या व तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.