Crime News
Crime Newsesakal

Jalgaon News : शिक्षक पतपेढीत कोट्यवधींचा गैरव्यवहार

Published on

भुसावळ : जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर नोकरांची सहकारी पतपेढीमध्ये दोन कोटी २४ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सावदा येथील नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यालयातील शिक्षक विनोद दिलीप महेश्री यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

जिल्हा माध्यमिक पतपेढीमध्ये ७ डिसेंबर २०२२ ला संचालक मंडळाने विजया दत्तात्रय पाटील मूळ मालक असलेल्या रिंग रोड सिटी सर्व्हे नंबर ७३१७, प्लॉट क्रमांक ६, सर्व्हे क्रमांक २४४/२ रिंग रोड जळगावचा उतारा दाखवून ले-आऊट जोडून हा भूखंड खरेदी केला. (Misappropriation of crores in Teachers Credit Fund Vinod maheshri allegations in a press conference jalgaon news)

Crime News
Nashik crime News : त्यांना तत्काळ अटक करा, अन्यथा...; मयत शिंदेच्या पत्नीचा पोलीस अधीक्षकांना इशारा

परंतु मूळ मालकाकडून भूखंड खरेदी न करता ७ डिसेंबर २०१७ ला योगीराज चंद्रहास्य चौधरी अबोली कन्स्ट्रक्शन (ब्रोकर) कोल्हेनगर जळगाव या दलालामार्फत मध्यस्थी करून जो भूखंड सह निबंधक नाशिक ३० मे २०१७ च्या पत्रानुसार विजया पाटील मूळ मालकाचा प्रस्ताव पाठविला असताना सदर भूखंड अबोली कन्स्ट्रक्शन (ब्रोकर) व्यक्तीकडून २२ डिसेंबर २०१७ ला खरेदी केला.

या भूखंडात दोन कोटी २४ लाखाचा गैरव्यवहार झाला असून, या प्रकाराची जिल्हा उपनिबंधक, सहनिबंधक, सहकार आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्हापेठ पोलिस ठाण्यात संबंधित चौकशी अधिकारी करीत आहेत.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Crime News
SAKAL Impact News : उद्यान दुरूस्तीच्या हालचालींना वेग; समस्या सोडविण्यास सुरवात

बारा हजार सभासद असलेले माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पतपेढी आहे. पतपेढी नावाजलेली असताना १९५४ मध्ये स्थापना झालेली आहे. या संचालक मंडळाची ३१ मेन २०२२ ला मुदत संपलेली असताना नोकर भरतीमध्ये कलम १९४४ जिल्ह्याधिकारी व कोरोनाचे आदेश असताना कोरोना काळात दोन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे.

तसेच मुख्य इमारत मोडकळीस दाखवून शासनाला खोटी माहिती देऊन इमारत दुरुस्तीसाठी दीड कोटीच्या आसपास खर्च करण्यात आला आहे. नवीन भूखंड खरेदी केलेल्या जागेवर वसतिगृहाचे नियोजन करून तेथेही ते वसतिगृह धूळखात पडलेले आहे. इमारतीत मोठ्या प्रमाणात बांधकामात गैरव्यवहार झालेला आहे, असा आरोप शिक्षक विनोद महेश्री यांनी पुराव्यानिशी पत्रकार परिषदेत केला.

Crime News
Nashik News : उंटवाडीजवळ मद्यधुंद कारचालकाची 3 वाहनांना धडक

निवडणुकीच्या तोंडावर दिशाभूल : भिरूड

विनोद महेश्री यांनी केलेले आरोप पतसंस्थेचे अध्यक्ष शालीग्राम ज्ञानदेव भिरूड यांनी फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, महेश्री हे खोटे आरोप करून निवडणुकीच्या तोंडावर सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. संस्थेने खरेदी केलेली जागा योग्य त्या मान्यता घेऊन खरेदी करण्यात आलेली असून, हा व्यवहार पारदर्शक आणि धनादेशाद्वारे झालेला आहे.

कोणत्याही जागेचे शासकीय मूल्य व प्रत्यक्ष खरेदी विक्री करताना बाजारमूल्य हे वेगवेगळे असते. ही बाब सुज्ञ सभासदांना ज्ञात आहे. पतपेढीला जागा खरेदी करताना पारदर्शक व्यवहार होणे गरजेचे असल्याने बाजारभावाच्या दरानुसार खरेदी करण्यात आलेली आहे. हा व्यवहार डिसेंबर २०१७ ला झाला असून, त्यानंतर भूमिपूजन व १ मार्च २०२० ला उद्घाटन करण्यात आलेले आहे. संस्थेने नियमानुसार योग्य ती परवानगी घेऊन कर्मचारी भरती केलेली आहे.

कर्मचारी भरती २०१८ व २०२० मध्ये झालेली आहे. जागा खरेदी व कर्मचारी भरती नंतर ३ ते ४ जनरल सभा झाल्या. या सभांना महेश्री उपस्थित होते. त्यांनी त्यावेळी कोणताही आक्षेप घेतला नाही. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Crime News
Jalgaon News : पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com