Mamta Sapkal News : माईंच्या संस्थेतील मुलांना उत्तम नागरिक बनविण्याचे मिशन : ममता सपकाळ

Jalgaon: Mamta Sapkal while answering the questions of Sudhir Gadgil in the interview program 'Athwaniti Ai' organized by Multimedia Features.
Jalgaon: Mamta Sapkal while answering the questions of Sudhir Gadgil in the interview program 'Athwaniti Ai' organized by Multimedia Features.esakal

Jalgaon News : अनेक अडचणी आल्या, संकटं आलीत. त्यावर रडत बसण्यापेक्षा त्याचे समाधान कसे शोधायचे, त्यावर मात कशी करायची, हे माईंकडून शिकले. संघर्षाचे जीवन जगणाऱ्या माई नेहमीच ‘सोल्यूशन मोड’वर असायच्या.

आता त्या नसताना संस्थेची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी म्हणून हा ‘सोल्यूशन मोड’ प्रत्येकवेळी कामी येतो.

संस्थेत दोनशेवर मुले आहेत, ती संख्या वाढेल. त्यांना उत्तम नागरिक बनवावे, असे आमचे मिशन असल्याचा निर्धार (कै.) सिंधूताई सपकाळ यांच्या कन्या ममता सपकाळ यांनी व्यक्त केला. (Mission to make children of Mai organization better citizens Mamta Sapkal Memories evoked through multimedia interview Jalgaon News)

Jalgaon: Mamta Sapkal while answering the questions of Sudhir Gadgil in the interview program 'Athwaniti Ai' organized by Multimedia Features.
Jalgaon News : मुख्य रस्त्यावर वाढतेय अतिक्रमण; कर्मचारी वाढवूनही ‘जैसे थे’

मल्टीमीडिया फीचर्स आयोजित भवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे प्रायोजित ‘आठवणीतील आई’ या सिंधूताईंच्या स्मृतींवर आधारित मुलाखतीत त्या बोलत होत्या.

साडेसहा हजारांहून अधिक मुलाखती घेणाऱ्या विख्यात मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी ही मुलाखत घेत सिंधूताईंच्या स्मृतींबद्दल ममतांना बोलतं केले.

संभाजीराजे नाट्यगृहात झालेल्या या भावस्पर्शी कार्यक्रमाला सज्जनशक्तींचा मोठा समुदाय उपस्थित होता.

Jalgaon: Mamta Sapkal while answering the questions of Sudhir Gadgil in the interview program 'Athwaniti Ai' organized by Multimedia Features.
Water Supply News : जळगाव शहरात शनिवारी पाणीपुरवठा बंद

सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर त्या कधी भावनिक होऊन, तर कधी दिलखुलासपणे बोलत्या झाल्या. त्या म्हणाल्या, की आमच्याकडे येणारी मुले कुठल्या तरी समस्येतून, अडचणीतून आलेले असतात.

त्यांना त्यातून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करावे लागते. ते आणल्यानंतर त्यांच्या शिक्षणाचा कल घेऊन त्यांना त्या स्वरूपाचे शिक्षण पुरविण्यासंबंधी प्रयत्न केले जातात.

माईच्या होकारानंतरच लग्न

व्यक्तिगत आयुष्य, बालपण, तारुण्य, विवाहाबद्दल विचारले असता, उच्च शिक्षणाच्या काळात मलाही प्रेम झाले, पण त्यातून मी पळून जाऊन लग्न केले नाही. नवऱ्याने प्रपोज केल्यानंतर ‘आईला विचारावे लागेल’, असे मी सांगितले. प्रेम आणि विवाह हा १२ वर्षांचा काळ आहे. माईने हो सांगितल्यानंतरच मी लग्नास होकार दिला, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon: Mamta Sapkal while answering the questions of Sudhir Gadgil in the interview program 'Athwaniti Ai' organized by Multimedia Features.
Market Committee News : जळगाव बाजार समितीत सभापती कोण?

दिवाळी कठीण गेली

माई गेल्यानंतरची स्थिती, मानसिकता कशी? या प्रश्‍नावर बोलताना क्षणोक्षणी वाटचालीत माईची आठवण येते. निर्णय घेताना माईला स्मरते आणि तिने हेच केले असते, असे मन सांगते तेव्हा मी तो निर्णय घेते. माई ४ जानेवारी २०२२ ला गेल्या.

त्यानंतर सहानुभूती म्हणून आमच्या संस्थेला बऱ्यापैकी मदत आली. माई गेल्यानंतर अजून तरी मोठ्या अडचणी सुरूच झालेल्या नाहीत. गेल्या दिवाळीला मात्र माई नसल्याची तीव्रता अधिक जाणवली.

संस्था चालविताना व्यावसायिकता कशी बाळगता? या प्रश्‍नावर ममता म्हणाल्या, माईंनी लावून दिलेली पद्धत, प्रक्रिया कायम पुढे ठेवली आहे. माई असताना, आम्ही खूप काटेकोर नव्हतो. आता मात्र आम्ही सर्व टीम काटेकोरपणाने वागतो.

सर्व व्यवहार पारदर्शी, चोख असावेत, यावर आमचा भर असतो, असे त्या म्हणाल्या. फैजपूरमध्ये बालपणी सात-आठ वर्षे राहिल्याचे सांगत त्यांनी तिथल्या आठवणी जागविल्या. प्रेक्षकांमधून आलेल्या प्रश्‍नांवर त्यांनी समर्पक उत्तरे दिलीत.

Jalgaon: Mamta Sapkal while answering the questions of Sudhir Gadgil in the interview program 'Athwaniti Ai' organized by Multimedia Features.
Water Supply News : जळगाव शहरात शनिवारी पाणीपुरवठा बंद

तत्पूर्वी मल्टीमीडियाचे संचालक सुशील नवाल यांनी प्रास्ताविकासह ममता सपकाळ व श्री. गाडगीळ यांचा परिचय करून दिला. भवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे ममता सपकाळ व त्यांच्या टीमचा स्वागत, सत्कार करण्यात आला. हर्शल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

गझलने रसिक मंत्रमुग्ध

ममता स्वत: गझलकार असल्याने श्री. गाडगीळ यांनी आग्रह धरल्यावर त्यांनी हे चित्त किती दिवसांनी थाऱ्यावर आले होते.

‘‘पाऊल सुखाचे माझ्या

दारावर आले होते..

मी फक्त यासाठी

ओळखले नाही कारण

प्रतिबिंब तुझे माझ्या

डोळ्यावर आले होते..’’

ही भावस्पर्शी गझल सादर केली.

Jalgaon: Mamta Sapkal while answering the questions of Sudhir Gadgil in the interview program 'Athwaniti Ai' organized by Multimedia Features.
Political News : उपमुख्यमंत्रिपदी दलित नेत्याची निवड करा, अन्यथा..; डीकेंची निवड होताच बड्या नेत्याचा थेट इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com