Bhaubeej Special : राजकीय मतभेद,त्यापलिकडे नाते अभेद्य

MLA Kishor Patil celebrated Bhaubij Vaishali Suryavanshi
MLA Kishor Patil celebrated Bhaubij Vaishali Suryavanshiesakal
Updated on

पाचोरा : राजकीय क्षेत्रात सध्या अनेक अपेक्षित, अनपेक्षित घटना घडत असल्याचे आपण पाहतो. राजकारणात काहीही अशक्य नसते, असा सूरही व्यक्त होतो. रक्ताच्या नात्यातील अनेक जण केवळ राजकीय मतभेद व विरोधातून एकमेकांचे वैरी होऊन जीवावर उठत असल्याचेही पाहायला मिळते.

असे असताना पाचोरा मतदारसंघातील दोन परस्पर वेगळ्या गटाचे व विचाराचे राजकारणी भाऊ, बहीण भाऊबीजेनिमित्त एकत्र आले व त्यांनी राजकीय मतभेद असले तरी नाते मात्र अभेद्य असते, या उक्तीची प्रचिती आणून दिली. या दोघा बंधू भगिनींच्या औदार्य व मानसिक मोठेपणाचे कौतुक व अभिनंदन होत आहे.(MLA Kishor Patil celebrated Bhaubeej to Vaishali Suryavanshi Jalgaon News)

MLA Kishor Patil celebrated Bhaubij Vaishali Suryavanshi
Jalgaon : भाऊबीजेला बहिणीकडे गेलेल्या भावाचा बुडून मृत्यू

पाचोरा -भडगाव विधानसभा मतदारसंघाचे बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार किशोर पाटील व माजी आमदार (कै.) आर. ओ. तात्या पाटील यांची कन्या व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्यात राज्यात शिंदे -फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर राजकीय ओढाताण व मतभेद पाहायला मिळत असले तरी या मतभेदांपलिकडे नाते महत्त्वाचे व पवित्र असते, याची प्रचिती ते सातत्याने आणून देत आहेत.

गेल्या रक्षाबंधन सणानिमित्त देखील आमदार किशोर पाटील यांनी वैशाली सूर्यवंशी यांचे निवासस्थानी जाऊन त्यांचेकडून आपल्या मनगटावर राखी बांधून घेतली होती. त्यावेळी वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांच्या कपाळी टिळा लावत त्यांचे हसतमुखाने औक्षण केले होते. भाऊबीजेनिमित्त देखील आमदार किशोर पाटील हे सकाळीच वैशाली सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी दाखल झाले.

त्यांचे हसतमुखाने औक्षण करत वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांना ओवाळले . दोघांमध्ये कौटुंबिक व नातलगांसंदर्भातील चर्चाही रंगली. हास्याचे फवारे उडाले. काही वेळानंतर भाऊबीजेची ओवाळणी देऊन आमदार किशोर पाटील आपल्या निवासस्थानाकडे मार्गस्थ झाले. राजकीय मतभेद व ओढाताण असली तरी नाते अभेद्य असते. विरोधातही नाते जपता आले पाहिजे. आदर्शत्वाची याची प्रचिती आमदार किशोर पाटील व वैशाली सूर्यवंशी यांनी आणून दिली.

MLA Kishor Patil celebrated Bhaubij Vaishali Suryavanshi
Jalgaon : अहो आश्चर्यम..! आनंदाचा शिध्याचे मध्यरात्रीपर्यंत वाटप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com