Jalgaon News : दिव्यांगांसाठी ‘मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल'! मोफत ऑनलाइन नोंदणी सुरू

ज्यातील दिव्यांगांना स्वावलंबी होण्याच्यादृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Disabled Person
Disabled Person esakal

Jalgaon News : राज्यातील दिव्यांगांना स्वावलंबी होण्याच्यादृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जिल्हा शाखेतर्फे ही माहिती देण्यात आली.(Mobile Shop on e Vehicle for disabled jalgaon news)

योजनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, त्यांना सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे त्यांच्या कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे या उद्देशाने योजनेची अंमलबजावणी राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागातर्फे करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ मिळण्यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सेतू सुविधा केंद्रातर्फे Https://evehicleform.mshfdc.co.in या संकेतस्थळावर विनामूल्य ऑनलाइन नाव नोंदणी करण्यात येत आहे.

Disabled Person
Jalgaon News: जिल्हाधिकाऱ्यांवरच वाळू माफियांकडून पाळत! पोलिसांना दिली माहिती

मोफत नाव नोंदणीसाठी कागदपत्रे घेऊन ४ जानेवारी २०२४ पर्यंत प्रत्यक्ष संपर्क करायचा आहे. त्यासाठीचा पत्ता असा : इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव, सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला, नवीन बी. जे. मार्केट जवळ, जळगाव.

आवश्‍यक कागदपत्रे

दिव्यांगांसाठीच्या ‘मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल’ या लाभासाठी आवश्‍यक असलेली कागदपत्रे अशी : आधारकार्ड, पॅनकार्ड, बॅंक पासबुक, पासपोर्ट फोटो, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, डोमिसाईल प्रमाणपत्र, रेशन अथवा मतदानकार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्ड.

Disabled Person
Jalgaon News : ग्राहकांना मिळणार मुद्रांक शुल्कासह दंडात सवलत; 31 मार्च 2024 पर्यंत मुदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com