औरंगाबाद : मद्यपी बसचालकाचा डुलत-डुलत पुणे-औरंगाबाद प्रवास

प्रवाशांशी हुज्जत घालून शिवीगाळ, अरेरावी : मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांनी केली लेखी तक्रार
drunk and drive case
drunk and drive case esakal

औरंगाबाद : खासगी शिवशाहीच्या मद्यपी चालकाने पुणे ते औरंगाबाद प्रवासात ठिकठिकाणी वाहन थांबून मद्यप्राशन केले. विशेष म्हणजे याबाबत जाब विचारणाऱ्या प्रवाशांना शिवीगाळ अरेरावी करून शिवीगाळही केल्याची घटना रविवारी (ता.२१) घडली. याप्रकरणी औरंगाबादच्या मध्यवर्ती बस स्थानकात आल्यानंतर प्रवाशांनी चालकाची तक्रार केली.

एसटी महामंडळाच्या संपामुळे एसटी महामंडळ प्रशासनाने औरंगाबाद-पुणे मार्गावर अकरा खासगी शिवशाही बस सुरू केल्या आहेत. खासगी शिवशाही वरील बस चालक बेजबाबदार पद्धतीने वागतात, हे वारंवार निदर्शनास आलेले आहे. असे असताना रविवारी (ता. २१) घडलेल्या घटनेमुळे प्रवाशांच्या हृदयाचा ठोका चुकला. बसमधील प्रवासी शरद अप्पा व्यवहारे यांनी आपबीती सकाळची बोलताना सांगितली.

drunk and drive case
नाशिक : शाळांमध्ये दोन वर्षांनतर आजपासून वाजणार घंटा

शिवाजीनगर पुणे येथून खासगी शिवशाही बस (क्र.एम.एच-०४ जेके-३१५७) ही बस रविवारी दुपारी अडीच वाजता निघाली. बस निघाल्यानंतर चालकाचा भरधाव वेगाने बस चालविण्याचा तोरा प्रवाशांच्या लक्षात आला. अचानक ब्रेक मारणे, कुठेही थांबविणे, रस्त्यावरच्या वाहनचालकांशी हुज्जत घालणे असे प्रकार सुरू होते. बस कशीबशी नगर पर्यंत आली, नगर बस स्थानकामधून बस बाहेर आल्यानंतर चालकाने चार विनातिकीट प्रवासी बसविले. त्यानंतर एका ठिकाणी स्कूल बस चालकशी हुज्जत घातली. पुढे पुन्हा तावातावाने रॅश ड्रायव्हिंग करत बस पुढे निघाली, कुठेतरी एका ठिकाणी बस थांबवून चालक गेला थोड्यावेळाने डुलत डुलत आला. तेव्हाच प्रवाशांना बस चालक मद्यप्राशन करून आलेला असल्याचे लक्षात आले. पुढे घोडेगाव येथे त्याने आणखी दोन महिलांना बसमध्ये बसवले. या महिलांनी बसमधील एका महिलेची पर्स हिसकावण्याचा प्रयत्नही केला. हा प्रकार प्रवाशांच्या लक्षात आला त्यानंतर काही वेळ गोंधळ झाला. त्यामुळे महिला तेथेच उतरून पळून गेल्या.

पुढे चालक महाशयांनी नेवासा येथे गाडी थांबविली. येथेही त्याने मद्यप्राशन केल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. नेवासा येथून निघाल्यानंतर वाळूज येथे एका रिक्षाचालकाला कट मारला त्यामुळे रिक्षाचालकाने बसचा पाठलाग सुरू केला. एएसक्लब जवळ बस थांबून चालकाची गचांडी धरण्याचा प्रयत्न रिक्षाचालकाने केला. मात्र, लगेच पोलिसांनी शिट्टी मारल्यामुळे रिक्षाचालक निघून गेला. पुढे बस निघाल्यानंतर नगर नाक्यावर एका प्रवाशाला उतरायचे होते, मात्र बस चालकाने बस थांबविणे ऐवजी प्रवाशांनाच शिवीगाळ सुरू केली. माझ्या मदतीला कोणीही धावून आले नाही, असा त्यांचा आरोप होता.

बाबा पेट्रोल पंपावरही त्यांनी प्रवाशांना उतरू दिले नाही. या प्रकाराने प्रवासी प्रचंड चिडलेले असल्याचे लक्षात येताच बस चालकाने मध्यवर्ती बस स्थानकाच्या बाहेरच प्रवाशांना उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र चिडलेल्या प्रवाशांनी बस आगारात घेण्यास सांगितले. बस आगारात आल्यानंतर एकही अधिकारी तक्रार करण्यासाठी उपलब्ध नव्हता, प्रवाशांनी सुरक्षारक्षकाकडे लेखी तक्रार केली. मात्र, बस स्थानकात बस लावून चालक अंधारातून पसार झाला. कशीबशी बस औरंगाबादला आल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com