Jalgaon News: महामार्ग चौपदरीकरण रावेर तालुक्यातूनच होणार : खासदार रक्षा खडसे

रावेर येथे बुधवारी (ता.२७) दत्त जयंती उत्सवात सहभागी होण्यासाठी खासदार खडसे आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
raksha khadse
raksha khadseesakal

Jalgaon News : नियोजित तळोदा -बऱ्हाणपूर हा राष्ट्रीय चौपदरी महामार्ग रावेर शहरातून व तालुक्याच्या पूर्व भागातूनच जाईल, याबाबतचे प्राथमिक आश्वासन आपल्याला केंद्रीय रस्ते वाहतूक व बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी दिले असून, त्यासाठी ‘न्हाई’ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक जळगाव येथे पाच जानेवारीला होणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

रावेर येथे बुधवारी (ता.२७) दत्त जयंती उत्सवात सहभागी होण्यासाठी खासदार खडसे आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (MP Raksha Khadse statement Highway four folding will be done from Raver taluka itself jalgaon news)

गेल्या पंधरा दिवसांपासून हा नियोजित राष्ट्रीय चौपदरी महामार्ग रावेर शहराऐवजी मुक्ताईनगर तालुक्यातून जाणार असल्याबाबतचे भूसंपादनाचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र विविध प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध झाले होते. याबाबत खासदार खडसे यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले, की हा महामार्ग रावेर तालुक्यासाठी ही तितकाच महत्त्वाचा आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातून एक महामार्ग आधीच जात असल्याने हा नियोजित महामार्ग रावेर तालुक्यातून जाणे व त्यामुळे रावेर तालुक्याचा विकास होणे खासदार म्हणून माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. २०१४ नंतर आपण यासाठी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने भूसंपादनाबाबतचे पाठविलेले पत्र हे अंतिम नाही. ‘न्हाई’च्या अधिकाऱ्यांनी याबाबतचे प्राथमिक पत्र मला दाखविल्यानंतर मी तातडीने हा राष्ट्रीय महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून नेण्यास विरोध केला आहे.

गडकरी यांना विनंती करून व निवेदन देऊन आपण नागपूर आणि भोपाळ येथील ‘न्हाई’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला असून, आगामी बैठकीत हा राष्ट्रीय महामार्ग रावेर तालुक्यातूनच नेण्याचा निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा राष्ट्रीय महामार्ग रावेर तालुक्यातून जाणे केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. रावेर शहराचा यापूर्वी म्हणावा तसा विकास झालेला नाही.

raksha khadse
Jalgaon District News: महावीर पतपेढीच्या कर्जावर हमी असल्याने सुरेश जैन यांच्यावर जप्ती; जिल्हा बँकेचा खुलासा

या राष्ट्रीय महामार्गाच्या निमित्ताने का असेना पण काही प्रमाणात विकास होऊ शकेल म्हणून आपला प्रयत्न रावेरसाठीच असल्याचे त्यांनी सांगितले. या राष्ट्रीय महामार्गाचे काम २०२५-२६ मध्ये सुरू होईल. त्यापूर्वी त्याचा अंतिम डीपीआर ‘न्हाई’चे दिल्ली येथील अधिकारी मंजूर करतील आणि कॅबिनेट केंद्रीय मंत्रिमंडळाचीही त्याला मंजुरी लागेल.

या सर्व बाबी होण्यास वर्ष, दीड वर्ष लागेल म्हणून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ६६ कोटी रुपये मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, सुनील पाटील, राजन लासूरकर पी. के. महाजन, सी. एस. पाटील, संदीप सावळे, शुभम पाटील, अरुण शिंदे, चेतन पाटील, उमेश महाजन, वासुदेव नरवाडे, नितीन पाटील, लखन महाजन आदी उपस्थित होते.

raksha khadse
Bhusawal Central Railway: 6 मार्गांवर रेल्वे धावू लागल्या तासाला 130 किलोमीटर वेगाने; मध्य रेल्वे ‘मिशन मोड’वर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com