वादळाने उद्‌ध्वस्त पिकांचे पंचनामे करा : खा. उन्मेष पाटील

banana Farm
banana Farmesakal

जळगाव : लोकसभा मतदार संघात (Lok Sabha constituency) २-३ दिवसापासून वादळी वाऱ्यासह पावसाने (Stormy Rain) जळगावसह भडगाव, पाचोरा, धरणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे (crops) नुकसान झालेले आहे. त्याचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशी सूचना खासदार उन्मेष पाटील यांनी केली आहे. (MP Unmesh Patil statement on crops destroyed by storm jalgaon news)

याबाबत खासदार पाटील यांनी जिल्हास्तरीय पीक विमा आढावा समिती व जिल्हास्तरीय पीक विमा तक्रार समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र दिले आहे. वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने, वादळीवाऱ्याने हिरावून नेल्याने शेतकरी संकटात सापडलेले आहेत. मुख्यत: केळी, पपई इ. पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तत्काळ होणे गरजेचे आहे.

पंचनाम्याशिवाय खरिपाची कामे नाही

खरीप हंगामाच्या तोंडावर पिकांचे नुकसान झाल्याने पुढील पिकांचे नियोजन करण्यासाठी शेती तयार करणे गरजेचे असून पंचनामे झाल्याशिवाय शेतामध्ये नुकसान झालेले पिके बाहेर काढता येत नसल्याचे कळले आहे. याबाबत संबंधित यंत्रणा व विमा कंपनी यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून आठवडाभरात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण करण्याबाबत आदेशित करावे जेणेकरून शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिके घेणे शक्‍य होईल.

banana Farm
जळगाव : पूर्वमोसमी पावसाची हजेरी; वादळासह तुरळक पाऊस

केळीबागांचे नुकसान

जळगाव व धरणगाव तालुक्‍यात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी केळी पिकाचा विमा मोठ्या प्रमाणात काढलेला आहे. तरी आपण संबंधित विमा कंपनीचे प्रतिनिधी यांना पुढील ८ दिवसात कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात असेही खासदारांनी पत्रात म्हटले आहे.

banana Farm
ऑनलाइन कर्जाच्या नावे फसवणूक; ग्रामीण भागातील तरुणास लुटले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com