ऑनलाइन कर्जाच्या नावे फसवणूक; ग्रामीण भागातील तरुणास लुटले

jalgaon cyber crime Fraud News
jalgaon cyber crime Fraud Newssakal

जळगाव : मोबाईल ॲप्लिकेशनच्या (Mobile Application) माध्यमातून ऑनलाइन काढलेल्या कर्जावर (Online Loan) व्याज देवूनही पुन्हा पैशांची मागणी करत तरुणाच्या नातेवाइकांना अश्लील मॅसेज (Pornographic messages) पाठवून ५३ हजार ५९३ रुपयांची फसवणूक (fraud) केल्याची घटना घडली. जळगाव सायबर पोलिस (Cyber Police) ठाण्यात अज्ञात मोबाइलधारकावर गुन्हा दाखल झाला आहे. (Online loan Fraud in rural area jalgaon Cyber crime news)

जामनेर शहरातील २८ वर्षीय तरुण कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्याचे ऑनलाइन सेवा केंद्राचे दुकान असून त्यावर त्याचा उदरनिर्वाह सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी (२९ मार्च ते ८ जून २०२२) दरम्यान या तरुणाने कॅश ॲडव्हान्स नावाच्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून वेळोवेळी २ लाख २९ हजार ९४ हजाराचे ऑनलाइन कर्ज घेतले. तरुणाने घेतलेल्या कर्जावर सर्व्हिस चार्ज म्हणून ८८ हजार ८१० रुपये कापून घेतले व उर्वरित १ लाख ४० हजार २५४ रुपये खात्यात जमा झाले. समोरील अज्ञात मोबाईलधारकांनी सात दिवसाच्या आत पैशांची मागणी केली.

jalgaon cyber crime Fraud News
नुकसानग्रस्त शेताचे सरसकट पंचनामे करा : गुलाबराव पाटील

त्यानुसार तरुणाने १ लाख ४० हजार २५४ रुपये आणि कर्जाच्या रकमेवरील व्याज ५३ हजार ५६४ रुपये असे एकूण १ लाख ९३ हजार ८१८ रुपये परत केले. दरम्यान अज्ञात व्यक्तींनी अजून पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझ्यासह तुझ्या कुटुंबीयांची बदनामी करू अशी धमकी दिली. तसेच तरुणाच्या मोबाईलचा डाटा चोरून तरुणासह नातेवाइकांना अश्लील मॅसेज पाठवून खंडणीची मागणी केली. या त्रासाला कंटाळून तरुणाने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे पुढील तपास करीत आहे.

jalgaon cyber crime Fraud News
जळगाव : पूर्वमोसमी पावसाची हजेरी; वादळासह तुरळक पाऊस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com