
चोपडा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा कोरोना संसर्गाचे कारण दाखवीत तब्बल तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार शासन करीत असल्याचा संताप लाखो विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.
आवश्य वाचा- सेवानिवृत्त उप अभियंत्याची केळी सातासमुद्रापार !
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही १४ मार्चला घेण्यात येणार होती. विद्यार्थ्यांनी याबाबत ऑनलाइन हॉल तिकीट, आयडी प्रूफ काढणे, अभ्यास व परीक्षेची मानसिक तयारी, घरभाडे, अभ्यासिका खर्च, लायब्ररी, टेस्ट सिरीज, रहिवास खर्च, घरभाडे डिपॉझिट, हे सर्व पाण्यात गेले असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिकसह मानसिक फटका तिसऱ्यांदा बसला आहे.
परीक्षा तिसऱ्यांदा स्थगित
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१९ ची जाहिरात काढली. यात तब्बल दोन वर्षे उलटली तरी साधी पूर्वपरीक्षा घेतली जात नाही. या मुळे बेरोजगारीमध्ये वाढ होत आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून २४० जागांसाठी दोन लाख ६३ हजार विद्यार्थी प्रविष्ट होणार होते. ही परीक्षा अगोदर एप्रिल २०२० मध्ये घेण्यात येणार होती. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलून ११ ऑक्टोबर २०२० ला होणार होती. मात्र, या वेळी या परीक्षेस मराठा संघटनांकडून होणारा विरोध पाहता शासन दबावाला बळी पडून पुन्हा ही परीक्षा पुढे ढकलून ती आता १४ मार्च २०२१ ला घेण्यात येणार होती.
आवर्जून वाचा- रिमांड होम मधून अल्पवयीन तरुण पळाला आणि सराईत चोरटा बनला
...असे होते आर्थिक नुकसान
विद्यार्थ्यांचे मानसिक नुकसानीसोबतच आर्थिक नुकसान झाले आहे. यात तब्बल तीन वेळा ऑनलाइन हॉल तिकीट, आयडी प्रूफ मूळ प्रतसह सांक्षाकित तीन प्रती काढण्यासाठी प्रतिविद्यार्थी ५० रुपये खर्च येतो. प्रत्येक वेळी नवीन टेस्ट सिरीज, पेपरसेट यासाठी ७०० ते एक हजार रुपये, अभ्यासिका खर्च, लायब्ररी खर्च, डिपॉझिटसह घरभाडे, प्रवास खर्च, रहिवास खर्च यांसह विविध खर्च मिळून प्रत्येक विद्यार्थ्यास एका महिन्याला आठ ते नऊ हजार रुपये खर्च येत आहे. सर्वसामान्य परिस्थिती असलेले बारा बलुतेदारांचे हे विद्यार्थी किती दिवस असे नुकसान सहन करतील? हे फक्त पूर्वपरीक्षेसाठी असे आहे. अजून मुख्य परीक्षा, त्यानंतर मुलाखत याला किती वेळ लागणार?
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.