Latest Marathi News | जळगावात STच्या बनावट पास विक्रीचा धक्कादायक प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fake bus pass

जळगावात STच्या बनावट पास विक्रीचा धक्कादायक प्रकार

जळगाव : बनावट पास बनवून विद्यार्थ्यांना विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात एसटी वाहकाने धाव घेत तक्रार दिली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथील एका दुकानातून शालेय विद्यार्थ्यांसाठी बनावट पास विक्री केल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याचे तक्रारदारकडून सांगण्यात आले. (Latest Marathi News)

हेही वाचा: Monkeypox: लस मंकीपॉक्सला रोखू शकत नाही; WHO चं महत्त्वाचं विधान

नशिराबाद-बेळी मार्गावर वरील बसवाहक हे विद्यार्थ्यांची पास तपासत असताना ती बनावट असल्याचे निदर्शनास आले. अधिक चौकशी केली असता पासबाबत कोणतीही नोंद नसल्याचे निष्पन्न झाले. या संदर्भात संबंधित विद्यार्थ्याची कसून चौकशी केली असता त्याने हा पास विकत घेतल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट परिसरातील एका दुकानातून अशा बनावट पास तयार करून विद्यार्थ्यांना विक्री केली जात असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली असून या प्रकरणी संबंधित वाहकाने जिल्हापेठ पोलिसात धाव घेतली आहे. याबाबत पोलीसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा: भाडे मागणाऱ्या घरमालकाच्‍या डोक्यात टाकला दगड; भाडेकरुविरुद्ध गुन्हा

Web Title: Msrtc St Fake Pass Sale In Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..