Jalgaon Municipality Bus : मनपाची शहर बससेवा जुन्या बसस्थानकापासून; एस. टी. महामंडळाची तत्वत: मान्यता

Municipal City Bus Service from Old Bus Stand jalgaon news
Municipal City Bus Service from Old Bus Stand jalgaon newssakal
Updated on

Jalgaon Municipality Bus : जळगाव महापालिकेतर्फे शहर बससेवा सुरू करण्यात येत आहे. बसेस उभ्या करण्यासाठी सुरू असलेला जागेचा शोध संपला असून, जुन्या बसस्थानकाच्या जागेवर बसेससाठी जागा देण्यास एस. टी. महामंडळाने तत्त्वत: मान्यता दिली असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. त्यानुसार आता जुन्या बसस्थानकापासून बसेसचे मार्ग आखण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.

जळगाव शहराची लोकसंख्या सहा लाखाच्या वर असल्यामुळे केंद्र शासनातर्फे शहर बससेवा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी केंद्रांच्या योजनेतूनच शहराला वातानुकूलीत मोठ्या, मध्यम आणि मिनी बसेस मिळणार आहेत. (Municipal City Bus Service from Old Bus Stand jalgaon news)

बससेवा सुरू करण्याबाबत महापालिकेच्या शेवटच्या महासभेत मंजूरी देण्यात आली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनातर्फे त्यांची अमंलबजावणीही सुरू करण्यात आली आहे.

जागेचा प्रश्‍न सुटला

महापालिकेतर्फे शहर बसेससाठी जागा शोधण्यात येत होती. अगोदर ख्वॉजामियॉं दर्ग्याजवळील मोकळ्या जागेवर स्थानक करण्यात येणार होते. मात्र त्याला विरोध झाल्याने महापालिकेने मेहरूण तलावाजवळील टी. बी. सॅनेटोरियमच्या जागेवर स्थानक सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ते शहराच्या बाहेर असल्याने जागेचा शोध सुरू होता.

या दरम्यान महापालिकेतर्फे जुन्या बसस्थानकाची जागा मागण्यात आली. मात्र त्यावेळी त्यांनी नकार दिला होता. आता एस. टी. महामंडळाने केवळ बससेवेसाठी जागा देण्याचे तत्वत: मान्य केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे बसस्थानकाच्या जागेचा प्रश्‍न सुटला आहे.

Municipal City Bus Service from Old Bus Stand jalgaon news
Jalgaon News : तहसीलदारांच्या मदतीने वृद्ध भारावले; संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानाचा मिळवून दिला लाभ

महापालिकेतर्फे रूटचे नियोजन

महापालिकेतर्फे आता शहर बससेवेच्या रूटचे नियोजन करण्यात येत आहे. जुन्या बसस्थानकापासून बसेस सुटणार असल्याने त्यानुसार नियोजन करण्यात येणार आहे. यात मोठ्या बसेस या महामार्गाच्या रूटवर, मध्यम बसेस शहरातील मुख्य कॉलनींसठी आणि मिनी बसेस या कॉलनी अंतगर्ततही असतील. या संपूर्ण इलेक्ट्रीक बसेस असतील व त्याचे चार्जिंगही जुन्या बसस्थानकावर करण्यात येईल. तसेच, शहरात इतर ठिकाणीही चार्जिंग पॉईट ठेवण्यात येणार आहेत.

असे आहेत नियोजित मार्ग

जुने बसस्थानक येथून सुटणाऱ्या बसेस विद्यापीठ, पाळधी, गोदावरी मेडीकल कॉलेज, वावडदा, उमाळा फाटा, कानळदा, इदगाव, असोदा, भादली, हरिविठ्ठल नगर, मोहाडी धानोरा, हुडको वसाहतमार्गे पिंप्राळा, संभाजीनगर, एकनाथनगर, निमखेडी, शिवधाम मंदिर, शिरसोली या ठिकाणांपर्यंत प्रवासी वाहतूक करतील. तर, रेल्वे स्टेशन चक्री मार्ग ते महापालिका सतरा मजली इमारत व रेल्वे स्टेशन ते गाडगेबाबा चौक या मार्गावरही बससेवा उपलब्ध असणार आहे.

Municipal City Bus Service from Old Bus Stand jalgaon news
Jalgaon News : रामानंदनगर पोलीस ठाण्याला अखेर मिळाली स्वत:ची जागा; या जागेवर शिक्कामोर्तब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com