Jalgaon News : रामानंदनगर पोलीस ठाण्याला अखेर मिळाली स्वत:ची जागा; या जागेवर शिक्कामोर्तब

Ramanand Nagar Police Station will be built in front of Chhatrapati Sambhaji Raje Theatre jalgaon news
Ramanand Nagar Police Station will be built in front of Chhatrapati Sambhaji Raje Theatre jalgaon news
Updated on

Jalgaon News : रामानंदनगर पोलिस ठाण्याचा कारभार गेल्या दहा-अकरा वर्षांपासून भाडे तत्त्वावरील खोलीत सुरु आहे. अनेक जागा बघितल्यानंतर अखेर महाबळ रोडवरील संभाजीराजे नाट्यगृहासमोरील अठरा गुंठे जागा या पोलिस ठाण्यास मिळाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी (ता. २६) सायंकाळी आदेश पारित केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मौजे मेहरुण (ता. जि. जळगाव) येथील सि.स.नं. ६४७८चे एकुण क्षेत्र ४३९८८.३ चौ. मि. पैकी १८००.०० चौ. मि. जागा रामानंदनगर पोलिस ठाण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. (Ramanand Nagar Police Station will be built in front of Chhatrapati Sambhaji Raje Theatre jalgaon news)

वनवास संपला

वाढती गुन्हेगारी, नागरीवस्तीचा झालेला विस्तार आणि कायदा व सुव्यवस्थेसह गुन्हेगारी अटोक्यात आणण्यासाठी साधारण ११ वर्षांपुर्वी जिल्‍हापेठ पोलिस ठाण्याचे विभाजन करत १५ ऑगस्ट २०१२ कोल्हेनगरात भाडेतत्वावर घेतलेल्या खोल्यांमध्ये तत्कालीन जिल्‍हाधिकारी ज्ञानेश्‍वर राजुरकर, जिल्‍हा पोलिस अधीक्षक एस. जयकुमार यांच्या हस्ते उद्‌घाटन होवुन कामकाज सुरू झाले होते.

तेव्हापासूनच तेथे ठाणे अंमलदाराला बसण्याची जागा पत्र्याच्या शेडमध्ये असून, उन्हाळ्यात असह्य उकाडा सहन करावा लागतो. तर, पोलिस निरीक्षकांच्या दालनाचे छतही पावसाळ्यात गळते. गुन्हेगारांना अटक केल्यानंतर त्यांना ठेवण्यासाठी कोठडी नसल्याने त्यांना जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात ने-आण करावी लागत होती.

अशात एक-दोन वेळा काही संशयीतांनी पळदेखील काढला हेाता. अशा अनंत अडचणींमुळे या पोलिस ठाण्यात बदली करुन जाण्यासही कोणी कर्मचारी, अधिकारी तयार होईना.

Ramanand Nagar Police Station will be built in front of Chhatrapati Sambhaji Raje Theatre jalgaon news
Jalgaon News : कर्ज देताना शेतकऱ्यांकडून कपात केलेले शुल्क परत होणार; सुभाष पाटील यांच्या मागणीला यश

मात्र, आज जिल्‍हाधिकाऱ्यांच्या आदेशाने रामानंदनगर पोलिस ठाण्याचा वनवास संपुष्टात आला असून, नव्याने विस्तारित झालेल्या येथील जागेत पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी जागा उलब्ध करुन देण्यात आली आहे.

नियोजन मंडळाचा निधी

जिल्‍हा नियोजन मंडळाकडून पोलिस दलासाठी मंजुर ११ कोटींच्या निधीतून जवळपास ९ कोटी रुपयांच्या खर्चातून विस्तीर्ण इमारत उभी केली जाणार आहे. तसेच, २ कोटींच्या नीधीतून संवेदनशील भागांसाठी पोलिस चौक्या उभारण्यात येतील.

नुकतेच जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत जिल्ह्यात अत्यावश्यक पोलिस चौक्यांच्या बांधकामावर चर्चा होऊन याबाबत पोलिस अधीक्षकांनी प्राध्यान्यक्रमानुसार यादी सादर केली होती. लवकरच या कामाला सुरवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Ramanand Nagar Police Station will be built in front of Chhatrapati Sambhaji Raje Theatre jalgaon news
Jalgaon Protest : बकालेच्या अटकेसाठी आता जंतर-मंतरवर करणार उपोषण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com