Jalgaon News : आयुक्तांची 50 लेटलतीफ कर्मचाऱ्यांना Warning; मनपाच्या प्रवेशद्वारावर मांडला ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Commissioner municipal corporation

Jalgaon News : आयुक्तांची 50 लेटलतीफ कर्मचाऱ्यांना Warning; मनपाच्या प्रवेशद्वारावर मांडला ठिय्या

जळगाव : महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शुक्रवारी (ता. १०) सकाळी दहाला महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मारून कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. त्यात ५० कर्मचारी उशिरा आल्याचे आढळले. त्यांना पुन्हा उशिरा न येण्याची वॉर्निंग देण्यात आली (municipal Commissioner warning to 50 late coming employees jalgaon news)

महापालिकेतील अनेक कर्मचारी उशिरा येतात, तर काही कर्मचारी केवळ ‘थम’ करून निघून जातात, अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शुक्रवारी अचानक हजेरी घेतली.

सकाळी दहाला त्या महापालिका प्रवेशद्वारावर हजर झाल्या. त्यांनी कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. त्यात तब्बल ५० कर्मचारी उशिरा आल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांनी त्यांच्यावर कोणतीही कडक कारवाई न करता वॉर्निंग दिल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आयुक्तांनी अचानक घेतलेल्या हजेरीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत आस्थापना अधीक्षक लक्ष्मण सपकाळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की आयुक्तांनी सकाळी प्रवेशद्वारावर सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. मात्र, प्रारंभिक स्वरूपात कोणावरही कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेले नाहीत.