
Vidya Gaikwad | घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट साध्य करा : आयुक्त डॉ. विद्या गायकवाड
जळगाव : महापालिकेच्या मिळकत थकबाकी वसुलीचे ३१ मार्चपर्यंत शंभर कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट साध्य करा, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Vidya Gaikwad) यांनी दिले.
थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी दिले. (municipal corporation Commissioner Dr Vidya Gaikwad statement about arrears abhay yojana jalgaon news)
महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात प्रभाग समिती क्रमांक एक ते चार अंतर्गत असलेले मालमत्ताकर वसुली नियंत्रण अधिकारी, प्रभाग अधिकारी, पथकप्रमुख, कर अधीक्षक व सर्व प्रभाग समिती कार्यासन लिपिक यांच्या आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
डॉ. गायकवाड म्हणाल्या, की मिळकत थकबाकी वसुलीच्या ‘अभय शस्ती’ योजनेस शहरातील मालमत्ताकर थकबाकीदारांचा खूप प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवार (ता. १७)पर्यंत निव्वळ ८५ कोटी ४८ लाख वसुली झाली आहे.
त्यात आठ कोटी २८ लाख रुपये नागरिकांना शास्ती माफ झाली आहे. एकूण वसुली ९३ कोटींपर्यंत पोचली आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. शंभर टक्के शास्ती माफीचा लाभ देऊनही थकबाकी न भरणाऱ्यांवर महाराष्ट्र महापालिका अधिनियम अन्वये जप्तीची धडक कारवाई करा.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
प्रत्येक पथकप्रमुखांना रोज पाच थकबाकीधारकांवर अधिनियमांतर्गत धडक कारवाई करण्याचे टार्गेट दिले. ३१ मार्चपर्यंत निव्वळ वसुली १०० कोटी रुपये करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जे पथक उद्दिष्ट पूर्ण करणार नाही, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. जे चांगली कामगिरी करतील, त्यांना प्रोत्साहन दिले जाईल, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
शहरातील मालमत्ता थकबाकीदारधारकांना मालमत्ता कराचा भरणा करता यावा, यासाठी शनिवारी व रविवारी दुपारी दोनपर्यंत प्रभाग समिती कार्यालये सुरू राहणार आहेत. नागरिकांनी त्याचा लाभ घेऊन थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे.