Municipal Corporation News : महापालिकेच्या आयुक्तांबाबत आज निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Municipal Corporation News : महापालिकेच्या आयुक्तांबाबत आज निर्णय

जळगाव : शहर महापालिकेच्या आयुक्तपदी कोण असणार, याबाबतचा निर्णय सोमवारी (ता. २३) औरंगाबाद येथील मॅट कोर्टात होणार आहे. महापालिकेच्या आयुक्तपदी कोण राहणार, याकडे अधिकाऱ्यांसह, नगरसेवक व जळगावकर नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये महापालिकेच्या आयुक्तपदावर असलेल्या डॉ. विद्या गायकवाड यांच्या जागी परभणी महापालिकेतून आलेले देवीदास पवार यांना सूत्र देण्यात आली होती. (Municipal Corporation Update Today decision regarding Municipal Commissioner Jalgaon News)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Petrol Price News : सर्वसामान्यांना धक्का! 'पेट्रोल स्वस्त होईल अशी अपेक्षा करू नका'

त्यांनीही जळगाव महापालिकेची तत्काळ सूत्रे हाती घेतली होती, पण कार्यकाळ पूर्ण झाला नाही आणि कोणतेही कारण न देता अचानक बदली झाली कशी, असे म्हणत या बदलीला डॉ. विद्या गायकवाड यांनी ‘मॅट’मध्ये आव्हान दिले होते.

यावर आता तिन्ही गटांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, निर्णय राखीव ठेवण्यात आला आहे. तो सोमवारी लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Mumbai News : मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा पथकाच्या विशेष कारवाईत 22 महिलांची सुटका