Jalgaon News | पाषणापासून भगवानपर्यंतची यात्रा म्हणजे पंचकल्याणक यात्रा : मुनिश्री संधानसागरजी महाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Munishree Sandhansagarji Maharaj speaking at the Panchakalyanak festival

Jalgaon News | पाषणापासून भगवानपर्यंतची यात्रा म्हणजे पंचकल्याणक यात्रा : मुनिश्री संधानसागरजी महाराज

पारोळा : साधना माणसाला महान बनवत असते आणि भावना त्याचे दगडात रूपांतर करीत असताना, विवेकाच्या पातळीवरून पडली तर वासना माणसाला हैवान व सैतान बनवते. बियाणे पेरण्यापूर्वी शेतकरी जमीन सपाट करतो.

खत आणि पाणी घालून ती सुपीक बनवतो. आज तुम्हाला तेच करावयाचे असून, चार गोष्टी लक्षात ठेवा. पंचकल्याणक म्हणजे काय? पंचकल्याणक का? पंचकल्याणक कोण करतो? आणि पंचकल्याणक कसे करायचे? पाषणापासून भगवानपर्यंतची यात्रा म्हणजे पंचकल्याणक यात्रा आहे, असे प्रतिपादन १०८ मुनिश्री संधानसागरजी महाराजांनी केले. (Munishree Sandhansagarji Maharaj Pratipadan Panchakalyan Mahotsav in Parole Jalgaon News)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

येथील एनईएस हायस्कूलच्या प्रांगणात पंचकल्याणक महोत्सवात ते बोलत होते. मुनिश्री १०८ संधानसागरजी महाराज म्हणाले, की पैराव्यनाक म्हणजे जीवन परिवर्तन विधी. भौतिक जगताच्या वर जाण्याचा प्रयत्न म्हणजे पंचकल्याणक.

जीवनाशी आपल्या निष्ठेची प्रतिष्ठा बळकट करण्यासाठी हा पंचकल्याणक महोत्सव आहे. दुसऱ्या पंचकल्याणकाची पूजा एक महान पूजा आहे. मोठी पूजा होत असते. शुद्धीकरण, तणाव आणि शिस्त या गोष्टी माणसाला स्वयंभू बनवतात, म्हणून आपण जीवन जगताना या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत.

टॅग्स :Jalgaon