जळगाव जिल्‍हा परिषदेत १८ कोटींचे परस्पर नियोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon zp

जळगाव जिल्‍हा परिषदेत १८ कोटींचे परस्पर नियोजन

जळगाव : जिल्हा परिषदेत(jalgaon jilha parishad) निधी वाटपात पदाधिकाऱ्यांसह काही सदस्यांना त्यांच्याच गटात विकास कामांसाठी निधी नियोजित केला जातो. अन्य सदस्यांना मात्र विश्वासात न घेता निधी तोडकाच दिला जातो. सत्ताधाऱ्यांसह गटनेते व काही ठरावीच सदस्यांना सोबत घेऊन १८ कोटींचे परस्‍पर नियोजन करण्यात आले आहे. शिवाय त्‍यास मान्यता घेण्याचा घाट देखील सुरू असल्‍याचा आरोप राष्‍ट्रवादीच्‍या सदस्‍या डॉ. निलम पाटील यांनी केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार(deputy cm ajit pawar) यांच्‍याकडे तक्रार केल्‍याचे देखील त्‍यांनी सांगितले.

हेही वाचा: जळगाव : युवकांमध्ये लसीकरणासाठी उत्साह

जिल्‍हा परिषदेतील सत्ताधारी सदस्‍यांकडून मागील पाच वर्षापासून निधी वाटपात अन्याय केला जात आहे. गटनेते सत्ताधाऱ्यांशी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून स्वत: च्या गटात कामे मंजूर करून घेतात. अन्य सदस्यांना मात्र वाऱ्यावर सोडतात. याबाबतदेखील उपमुख्‍यमंत्री यांच्याकडे तक्रार केली. विशेष म्हणजे भाजपच्या सदस्यांनादेखील निधी देताना मापात पाप केले जात असून राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या अनेक सदस्यांना निधीत मोठ्या प्रमाणात कुचराई केली जात आहे. काही सदस्यांच्या पदाधिकाऱ्यात कोटीची कामे दिली आहे. तर अन्य सदस्यांच्या गटातदेखील ४० लाखाचा फरक निधी वितरित करताना झाला आहे.

हेही वाचा: जळगाव : महापालिकेत नामंजूर वार्षिक अहवालाला परस्‍पर मंजुरी

उद्या उपमुख्‍यमंत्र्यांची घेणार भेट

३०५० व ५०५४ तसेच सिंचनाच्या हेडवरील १८ कोटीची कामे यात ठरावीक सदस्यांचीच कामे दिली. त्यात आमच्यावर अन्याय झाला असल्‍याचे डॉ. निलम पाटील यांनी सांगितले. याबाबत माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा केली आहे. १८ कोटीचा निधी थांबवा या मागणीसाठी एकनाथ खडसे यांच्यासह जिल्हाध्यक्ष ॲड. पाटील व स्‍वतः देखील ५ जानेवारीला मुंबई येथे उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांची भेट घेणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

भाजप सदस्‍यांचाही आरोप

निधी वाटपासंदर्भात भाजपच्‍या सदस्‍यांमध्‍ये देखील नाराजी आहे. यात भाजपचे निलेश पाटील, निर्मला पाटील यांनी देखील निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला. सत्ता आमची पण आम्हालाच निधी कमी मिळतो आहे. पदाधिकारी व काही ठरावीक सदस्यच निधी वाटप करून नियोजन करतात. अन्य सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही असे आरोप त्यांनी केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaon
loading image
go to top