अंतरात आता लक्ष ज्योती, तुम्हा शेजारती पापणीत..!

कविवर्य ना. धों. महानोर; सहस्रचंद्रदर्शन वर्षपूर्तीनिमित्त व्यक्त केल्या भावना
N D Mahanor expressed his feelings about his poem
N D Mahanor expressed his feelings about his poem sakal
Updated on

जळगाव : ‘कविता’ या तीन शब्दांनी मला भरभरून दिलं. अगदी मोलमजुरांपासून अमेरिकेतील मराठी जाणणाऱ्या लोकांपर्यंत सर्वांनी मोठं केलं.. या सकलांचा मी ऋणी, कृतज्ञ आहे. ‘अंतरात आता लक्ष लक्ष ज्योती, तुम्हा शेजारती पापणीत..’ अशा शब्दांत कविवर्य ना.धों. महानोर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कविश्रेष्ठ महानोर शुक्रवारी (ता.१६) वयाची ८० वर्षे पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत, या सहस्रचंद्रदर्शन वर्षपूर्तीनिमित्त त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ‘सकाळ’ शी नेहमीच्याच विनम्र शैलीत दिलखुलास बातचीत केली.

आपल्या जीवनाचा प्रवास उलगडताना महानोर म्हणतात, ‘‘ऐंशी वर्षे झाली.. आता वाटतं खूप जगलो.. आजूबाजूला शून्य होतं, घरची स्थिती गरिबीची.. कुटुंबातील वातावरणही तसं नव्हतं.. पण, तरीही ‘कविता’ या तीन अक्षरी शब्दाने मला देशात नव्हे तर जगभरात नाव दिलं. ज्या शेतात, मातीत राहिलो, जो निसर्ग पाहिला त्याला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला. ते लोकांना आवडलं, त्यातून मलाही समाधान मिळालं. मागे वळून पाहताना ‘आपण तेच आहोत का?’ हा प्रश्‍नही पडतो,’’ असे महानोर म्हणाले.

.. तर कुणी उपाशी राहणार नाही

मी शेतीतला माणूस. जे चांगले प्रयोग केले ते राज्याला दिले. शेतकरी जगला पाहिजे, हीच प्रामाणिक भावना. तो बलदंड योद्ध्यासारखा आहे, त्याने लढलेच पाहिजे. ‘हा काळोखाचा रस्ता आपुला नाही’ असे निराश शेतकऱ्यांना नेहमी सांगतो. शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करावेत. त्यातून कुणीही उपाशी राहणार नाही. जीवन प्रवासात अनवधानाने कुणी दुखावले असेल तर दिलगीर आहोत, अशी विनम्र भावनाही महानोरांनी व्यक्त केली.

तरुणांनी साधनेतून लेखन करावे

साहित्य, कविता, कलेत लेखन करणाऱ्या तरुणाईस संदेश देताना महानोर म्हणाले, ‘‘ह्या सजग तरुणाईत उत्साह, कल्पकता आहे. पण, कसदार लेखनासाठी त्यांनी साधना करावी, थोडं सबुरीनं घ्यावं, त्यातून त्यांचे लेखन समृद्ध होईल.’’ पुढे काय? या प्रश्‍नावर बोलताना महानोर म्हणतात, ‘‘आता डोळ्यांच्या त्रासामुळे लिहिणे थांबलंय.. वाचनही होत नाही. तरीही ५० वर्षांपूर्वी जे वाचलं, ते पुन्हा चाळण्याचा शक्य झाला तर प्रयत्न करेल. त्यातून नव्याने स्वत:ला समजून घेईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com