Nashik Graduate Constituency : डॉ. तांबेंच्या वर्चस्वाला डॉ. राजेंद्र विखे रोखणार?

Dr Sudhir Tambe & Dr rajendra vikhe
Dr Sudhir Tambe & Dr rajendra vikheesakal
Updated on

जळगाव : नाशिक पदवीधर मतदारसंघ एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला समजला जात होता; परंतु २००९ पासून काँग्रेसचे सुधीर तांबे यांनी सलग तीन वेळा भाजप उमेदवाराला या मतदारसंघात धूळ चारून वर्चस्व निर्माण केले आहे.

या वेळी त्यांना रोखण्यासाठी भाजपतर्फे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे लहान बंधू डॉ. राजेंद्र विखे पाटील यांचे आव्हान उभे करण्याची चर्चा भारतीय जनता पक्षाच्या गोटातून व्यक्त होत आहे. (Nashik Graduate Constituency dr Rajendra Vikhe Will stop Dr tambe supremacy jalgaon news)

नाशिक पदवीधर मतदारसंघात जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार आणि अहमदनगर हे चार जिल्हे आहेत. या मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. १२ जानेवारीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

काँग्रेसतर्फे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने त्यांनी तयारीही केली आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचाही पाठिंबा असणार आहे. त्यामुळे ते आता महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. डॉ. सुधीर तांबे यांचा या मतदारसंघात दांडगा संपर्क आहे.

हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. नाशिक येथील ना. स. फरांदे व धुळे येथील प्रतापदादा सोनवणे यांनी भाजपतर्फे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रतापदादा सोनवणे यांच्या निधनानंतर २००९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत डॉ. तांबे यांनी काँग्रेस बंडखोर म्हणून निवडणूक लढविली आणि त्यांनी भाजपचे डॉ. प्रसाद हिरे, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. नितीन ठाकरे यांचा पराभव केला.

त्यानंतर २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी मिळाली. त्यांनी भाजपचे डॉ. सुहास फरांदे यांचा तब्बल ३५ हजार मतांनी पराभव केला. २०१७ मध्ये त्यांनी भाजपचे उमेदवार प्रशांत पाटील यांचा तब्बल ४५ हजार मतांनी पराभव करून हॅटट्रिक साधली होती.

डॉ. तांबे यांचा मतदारसंघात संपर्क चांगला आहे. याशिवाय त्यांची कार्यकर्त्यांची फळीही आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Dr Sudhir Tambe & Dr rajendra vikhe
Nashik News : आयुक्तालयाच्या Special Sqaudच्या 4 पथकांसाठी प्रमुखांची नियुक्ती!

भाजप ने या वेळी काँग्रेसकडून हा मतदा संघ पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी कंबर कसल्याचे सांगण्या येत आहे. या वेळी डॉ. तांबे यांच्यासमोर नगरमधूनच तगडे आव्हान उभे करण्याची खेळी करण्यात येणार आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे लहान बंधून डॉ. राजेंद्र विखे पाटील यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर दौऱ्यावर असताना त्यांची चर्चाही झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्या वेळी डॉ. विखे पाटील यांनी उमेदवारीबाबत चर्चा नसल्याचे सांगितले होते. मात्र भाजपकडून त्यांनाच संधी देण्यात येणार असल्याचेही भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

भाजपच्या एका नेत्यांनी सांगितले, की गेल्या तीन निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचा उमेदवार नगर जिल्ह्यात मागे पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या वेळी तांबे यांच्यासमोर नगरमधूनच आव्हान उभे करण्याची भाजपची तयारी आहे. डॉ. विखे पाटील हे राजकारणात नाहीत, मात्र ते प्रवरा अभिमत विद्यापीठाने कुलपती तथा प्रवरा मेडकल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.

त्यांना उमेदवारी मिळाल्यास ही निवडणूक नगर जिल्हा केंद्रित होऊन काँगेसचे बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील, अशी लढत होईल. कारण डॉ. तांबे हे बाळासाहेब थोरात याचे मेहुणे आहेत.

Dr Sudhir Tambe & Dr rajendra vikhe
Nashik NMC News : 50 टक्के गाळेधारक थकबाकीदार; अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास जप्तीची कारवाई!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com