Eknath Khadse Update : नाथाभाऊ, गेले कुणीकडे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadse News

Eknath Khadse Update : नाथाभाऊ, गेले कुणीकडे?

जळगाव : कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांच्या नेहमीच संपर्कात असलेले, तसेच एकाच रिंगमध्ये फोन घेणारे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’असल्याने कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. नाथाभाऊ नक्की गेले कुणीकडे, असे कार्यकर्ते विचारू लागले आहेत.

आमदार एकनाथ खडसे हे कायम कायकर्त्यांच्या संपर्कात असतात, कधी कधी तर ते स्वत:हून कार्यकर्त्यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा करीत असतात. मात्र गेल्या आठ दिवसांपासून त्यांचा फोन संपर्कात नसल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. (NCP Big Leader Eknath Khadse Is missing NCP Activists ask questions about eknath khadse jalgaon political news)

हेही वाचा: Nashik News : सिंचन पुनर्स्थापना खर्चाची दंडमाफी शासन दरबारी; निर्णयाची प्रतीक्षा

एकनाथ खडसे आठ दिवसांपूर्वी नियमित तपासणीसाठी मुंबईत गेले होते. त्या वेळी त्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्कही झाला होता. त्यानंतर मात्र गेल्या सहा-सात दिवसांपासून त्यांचा फोन संपर्कक्षेत्रात नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत त्यांचे सहकारी राष्ट्रवादी काँगेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की नाथाभाऊ मुंबई येथे गेलेले असताना त्यांच्या पायाला दुखापत झाली.

त्यांच्या पायाची नसवर नस चढल्यामुळे त्यांना चालणे कठीण झाले. त्यानंतर त्यांनी बाँबे हॉस्पिटलमध्ये तीन दिवस उपचार घेतले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरीच विश्रांतीचा सल्ला दिला. त्यामुळे ते मुंबईतच आपल्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. त्यांनी मोबाईलही स्वीच ऑफ केल्याचे त्यांनी सांगितले. आपला तीन-चार दिवसांपासून संपर्क झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

हेही वाचा: Nashik News : औरंगाबाद रोडवरील ‘तो’ सिग्नल पुन्हा बंद! बेशिस्त वाहतुकीतून पुन्हा अपघाताचा धोका

एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली, त्या ठिकाणी ते विजयी झाले. पक्षातर्फे अद्याप संधी दिलेली नाही. मात्र कायम कार्यकर्ते व जनतेच्या संपर्कात असणारे खडसे यांची संपर्क क्षेत्राबाहेर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत, आता याबाबत खडसे यांच्याशी संपर्क झाल्यानंतरच खुलासा होऊ शकेल.

हेही वाचा: Nashik Crime News : सातपूरमध्ये 30 वर्षीय तरुणाचा खून

टॅग्स :Eknath KhadseJalgaonNCP