Nashik Crime News : फेसबुक पोस्टवरून हसल्याने तरुणाचा खून

Santosh Jaiswal
Santosh Jaiswalesakal

नाशिक : सातपुर गावातील गोरक्षनाथ रोड मळे परिसरातील काश्मिरे व सोनवणे यांच्या मळ्यातील चाळीत रहाणाऱ्या परप्रांतीय तरुणांमध्ये काल रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास वाद झाला, त्यातुन संतोष जयस्वाल या परप्रांतीय तरूणाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. (Thirty Year old young boy murdered in Satpur nashik crime news)

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

Santosh Jaiswal
Nashik News : सिंचन पुनर्स्थापना खर्चाची दंडमाफी शासन दरबारी; निर्णयाची प्रतीक्षा

सोनवणे चाळीतील रामकिशन निषाद नामक परप्रांतीय संशयित युवकाने काश्मिरे चाळीतील संतोष जयस्वाल (वय 30 मुळगाव आझमगड) या युवकास लोखंडी राॅडने डोक्यात गंभीर मारहाण केली, जखमी संतोष जयस्वाल याला त्याच्या नातेवाईकांनी सातपुर मधील, खासगी तसेच ईएसआय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, त्यांना जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने जखमी संतोष जयस्वालची तपासणी केली असता त्याला मृत घोषित करण्यात आले, सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांची सर्व पथके तात्काळ घटनास्थळी पोहचले.

दरम्यान संतोष जयस्वाल मयत झाल्याचे समजताच मारहाण करणारा संशयित रामकिशन निषाद व त्याचे अन्य साथीदार फरार झाले असुन पोलिस प्रशासन संशयितांचा शोध घेत त्यांच्या मागावर आहेत. फेसबुकवर फोटो पोस्ट केल्यानंतर संशयिताने हसल्याची कमेंट टाकली होती, यावरून दोघांचे वाद असल्याचे समजते, सातपुर पोलीस पुढील तपास करीत आहेत. (

Santosh Jaiswal
Nashik News : औरंगाबाद रोडवरील ‘तो’ सिग्नल पुन्हा बंद! बेशिस्त वाहतुकीतून पुन्हा अपघाताचा धोका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com