New Education Policy : नव्या शैक्षणिक धोरणावर ‘उमवि’त मंथन; अंमलबजावणीसाठी जनजागृती करणार

While guiding the experts in the field of education, Vice-Chancellor Prof. V. L. Maheshwari.
While guiding the experts in the field of education, Vice-Chancellor Prof. V. L. Maheshwari. esakal

Jalgaon News : कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना येत्या २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याच्या तयारीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गुरुवारी (ता. २७) झालेल्या कार्यशाळेत सर्वांगीण चर्चा करण्यात आली. (new education policy brainstorming in umvi kbcnmu jalgaon news)

येत्या महिन्याभरात शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांपर्यंत या धोरणाविषयीची जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात दिवसभर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर विद्यापीठाशी संलग्नित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांचे सर्व प्राचार्य, संचालक, अधिष्ठाता, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, अधिसभा सदस्यांची कार्यशाळा घेण्यात आली.

शासनाने या धोरणासंदर्भात गठीत केलेल्या समितीचे सदस्य कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, निवृत्त प्राचार्य अनिल राव, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्रा. आर. डी. कुलकर्णी यांनी पहिल्या सत्रात सविस्तर मार्गदर्शन केले. व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांची या वेळी उपस्थिती होती.

प्रारंभी अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे यांनी प्रासताविक केले. प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी शैक्षणिक धोरणाचा आराखडा कसा असेल, यावर पॉवरपॉइंट सादरीकरण केले. त्यानंतर खुल्या चर्चेत प्राचार्य अनिल राव, प्रा. आर. डी. कुलकर्णी आणि प्रा. व्ही. एल. माहेश्‍वरी यांनी सहभाग घेऊन उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

While guiding the experts in the field of education, Vice-Chancellor Prof. V. L. Maheshwari.
Rain Damage : नशिराबादला वृक्ष पडून घरांचे नुकसान; अर्धा तास चालले थैमान

महाविद्यालय, जिल्हा पातळीवर कार्यशाळा

वर्कलोडमध्ये थोडा फरक पडेल. पारंपरिक विचार न करता नावीन्यपूर्ण कोर्सेस तयार करावेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालकांपर्यंत सर्व माहिती व्हावी, यासाठी जिल्हा व महाविद्यालयीन स्तरावर कार्यशाळा घेतल्या जातील, असे या वेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारी कौशल्ये आणि क्षमता याचा अंतर्भाव या धोरणात करण्यात आल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली.

दुपारच्या सत्रात प्रा. दीपक दलाल यांनी परीक्षा पद्धती, तसेच प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी परीक्षा पद्धतीत शिक्षकांच्या योगदानाविषयी संवाद साधला. डॉ. विजय घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले. अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाचे संचालक प्रा. समीर नारखेडे यांनी आभार मानले.

या बाबींचा असेल अंतर्भाव

या शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या श्रेयांक आणि अभ्यासक्रम आराखड्याची माहिती कार्यशाळेत देण्यात आली. नव्या धोरणानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय विद्यार्थ्यांपुढे असेल, त्याला ऑनर्स पदवी म्हटले जाईल. तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रमही कायम राहील. पहिल्यावर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांस क्रेडिट गुणांकन पद्धतीनुसार अभ्यासक्रम शिकविला जाईल.

While guiding the experts in the field of education, Vice-Chancellor Prof. V. L. Maheshwari.
Government Ordinance : गाळे भाडेपट्ट्यासाठी 3 टक्के आकारणी; शासनाचा अध्यादेश

विद्यार्थ्यांला प्रत्येक टप्प्यावर बाहेर पडताना दहा क्रेडिटच्या दोन महिन्यांची इंटर्नशीप आणि स्कील कोर्स, तसेच आवश्यक तेवढे क्रेडिट मिळवावे लागतील. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात पहिल्या वर्षांनंतर प्रमाणपत्र दिले जाईल. मात्र, किमान ४० आणि कमाल ४४ क्रेडिट गरजेचे आहेत. दुसऱ्या वर्षांनंतर म्हणजे चार सेमिस्टरनंतर डिप्लोमा प्रमाणपत्र (किमान ८० व कमाल ८८ क्रेडिट गरजेचे) दिले जाईल.

तिसऱ्या वर्षांनंतर पदवी प्रमाणपत्र (किमान १२० व कमाल १३२ क्रेडिट गरजेचे) दिले जाईल. चौथ्या वर्षी आठ सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर संशोधन किंवा स्पेशालायझेशन पूर्ण झाल्यानंतर ऑनर्स (किमान १६० व कमाल १७६ क्रेडिट गरजेचे) पदवी जाईल. चौथ्या वर्षांत प्रतिसत्र किमान २० क्रेडिटसह इंटर्नशीप आणि मुख्य विषय अभ्यासक्रमात असतील.

चार वर्षांची ऑनर्स पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तरसाठी एक वर्ष किंवा दोन सेमिस्टर पूर्ण करावे लागतील. या नवीन धोरणात विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य असणार आहे. अभ्यासक्रमात मेजर आणि मायनर विभाग करण्यात येतील. मायनर विभागात विद्यार्थ्यांना आपल्या शाखेव्यतिरिक्त आवड असलेला विषय शिकता येईल. तो विद्यार्थी इतर महाविद्यालयातूनही आवडीचा विषय शिकू शकेल.

While guiding the experts in the field of education, Vice-Chancellor Prof. V. L. Maheshwari.
Jalgaon Unseasonal Rain : पन्नासपेक्षा अधिक घरांचे बेळीत उडाले छत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com