Maharashtra Police : पोलिस दलात दाखल होणार नव्या High Tech वाहनांचा ताफा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Police vehicle

Maharashtra Police : पोलिस दलात दाखल होणार नव्या High Tech वाहनांचा ताफा

जळगाव : जिल्हा पोलिस दलाच्या बळकटीकरणासह ‘आपले पोलिस’ संकल्पनेच्या माध्यमातून ११२ वाहन खरेदीसाठी २ कोटी ६६ लाखाचा निधीस मंजुरी देण्यात आली आहे. यात २५ बोलेरो आणि ८५ होंडा शाईन दुचाकी, १ मारुती कार व १ बोलेरो पिकअप व्हॅन आदी वाहनांचा समावेश आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी नियोजन विभागाकडे दिला होता. त्यानुसार ११२ वाहने लवकरच पोलिस दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

हेही वाचा: संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

सीसीटीव्हीसाठी १० कोटी निधी

नव्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या पोलिस दलाचे मनोबल उंचावणार असून, अधिक सक्षम होण्यास मदत होईल, तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीही १० कोटींच्या निधीची तरतूद केली असून, गृह विभागाकडून तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर लागलीच जिल्हा नियोजन समितीतून मंजुरी देणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

पोलिस दलात असलेली वाहने कालबाह्य झाल्याने, तसेच त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी अधिक पैसा खर्च होत असल्याने पोलिस दलाकडून जिल्हा नियोजन समितीकडे वाहनांसाठी पोलिस अधीक्षकांनी प्रस्ताव दिला होता. मागील महिन्यात झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत वाहन खरेदीसाठी पालकमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

हेही वाचा: Khekra Police : लेडी कॉन्स्टेबलला I Love You म्हणणं पडलं भारी; पोलिस अधिकाऱ्याला तात्काळ केलं निलंबित!

वाहन खरेदी करण्याबाबत वाहतूक शाखेचे निरीक्षक मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया राबविण्यात येत असून, असून लवकरच एका कार्यक्रमात पोलिस दलात वाहने दाखल करण्यात येणार आहेत.

गेल्या वर्षी ६७ वाहने दाखल

मागील वर्षी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार डीपीडीसीमधून २९ महिंद्रा बोलेरो व ३८ शाईन होंडा प्रदान करण्यात आल्या होत्या. यासाठी २ कोटी ३० लक्ष निधी मंजूर होता.

हेही वाचा: Jalgaon News : जळगावचे आजोळ असलेल्या सुरभीने गाजविले KBC!