लेडी कॉन्स्टेबलला I Love You म्हणणं पडलं भारी; पोलिस अधिकाऱ्याला तात्काळ केलं निलंबित! Khekra Police | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UP Police

एका पोलिस अधिकाऱ्याला महिला कर्मचाऱ्याला 'आय लव्ह यू' म्हणणं चांगलंच भारी पडलंय.

Khekra Police : लेडी कॉन्स्टेबलला I Love You म्हणणं पडलं भारी; पोलिस अधिकाऱ्याला तात्काळ केलं निलंबित!

बागपत : एका पोलिस अधिकाऱ्याला महिला कर्मचाऱ्याला 'आय लव्ह यू' म्हणणं चांगलंच भारी पडलंय. बागपत जिल्ह्यात खेकरा पोलिस ठाण्याचे (Khekra Police Station) तत्कालीन इन्स्पेक्टर डीके त्यागी यांचं एका महिला कॉन्स्टेबलला आय लव्ह यू म्हणण्याचं कृत्य कॅमेऱ्यात कैद झालंय.

याप्रकरणी पोलिस निरीक्षकाला निलंबित केल्यानंतर आता अंतर्गत तक्रार समितीनंही चौकशी सुरू केलीय. तपास अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. खेकरा पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक देवेंद्रकुमार त्यागी (Devendrakumar Tyagi) यांनी महिला कर्मचाऱ्याला अपशब्द वापरत तिला आय लव्ह यू म्हटलंय. पोलिस निरीक्षकाचं हे कृत्य महिला कॉन्स्टेबलनं आपल्या मोबाईलमध्ये कैद केलं. एवढंच नाही, तर त्या महिलेनं 11 डिसेंबरला एसपी नीरज कुमार जदौन यांच्याकडंही तक्रार केली. इतर महिला पोलिस कर्मचाऱ्यांनीही एसपीकडं तक्रार केली आणि पोलिस अधिकाऱ्यावर अपशब्द वापरल्याचा आरोप केला.

हेही वाचा: Love jihad : मुस्लिम पुरुष हिंदू मुलीची हत्या करतो, तेव्हा आम्ही..; असं का म्हणाले CM सरमा?

तपासानंतर पोलिस अधिकारी निलंबित

प्रकरण गांभीर्यानं घेत एसपींनी खेकरा सीओ विजय चौधरी यांच्याकडं तपास दिला. तपास अहवालात तक्रारीची पुष्टी झाल्यानंतर मंगळवारी रात्री एसपींनी निरीक्षक देवेंद्रकुमार त्यागी यांना निलंबित केलं. बुधवारी ही बाब पोलिस विभागात चर्चेत राहिली. दुसरीकडं, एसपी नीरजकुमार जदौन यांनी सांगितलं की, 'निरीक्षकावर विभागीय कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. या संपूर्ण प्रकरणाची अंतर्गत तक्रार समिती चौकशी करेल. या समितीच्या अध्यक्षा सीओ प्रीता आहेत. चौकशी अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.'

हेही वाचा: Bhima Koregaon Case : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाला नवं वळण; अमेरिकन फर्मनं केला खळबळजनक दावा!