Collector Abhijit Raut
Collector Abhijit Rautsakal

जळगाव जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी लागू

रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत निर्बंध; कार्यक्रमांसाठी दिशानिर्देश
Published on

जळगाव : राज्यात (maharashtra)ओमिक्रॉनच्या (omicron)वाढत्या संख्येमुळे कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यातही(jalgaon district) नव्याने निर्बंध जारी करण्यात आले आहेत. रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून जाहीर, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नवे दिशानिर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत (collector abhijit raut) यांनी शनिवारी रात्री हे आदेश पारित केले. राज्य सरकारने याबाबत कठोर सूचना दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने याबाबत सतर्कतेचा इशाराही दिला आहे.

Collector Abhijit Raut
दोन बायका आणि कहाणी ऐका...;पाहा व्हिडिओ

असे आहेत निर्देश

  1. रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत पाचपेक्षा अधिक जण एकत्र येण्यास बंदी

  2. बंदिस्त जागेत विवाह सोहळ्यासाठी १०० जण तर मोकळ्या जागेतील सोहळ्यात २५० अथवा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीच बंधनकारक.

  3. अन्य सामाजिक, राजकीय कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत १०० जण तर मोकळ्या जागेत क्षमतेच्या २५ टक्के उपस्थिती.

  4. क्रीडा स्पर्धा, कार्यक्रमांसाठी क्षमतेच्या २५ टक्के उपस्थिती

  5. कीर्तन, रथोत्सव, पालखी, कुस्ती, दंगल, यात्रा- जत्रा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्‍यक

  6. रेस्टॉरंट, जीम, स्पा सेंटर, सिनेमा हॉल याठिकाणी आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती

  7. अशा सर्व ठिकाणी उपस्थित राहणाऱ्यांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असाव्यात, सोबत प्रमाणपत्र बाळगावे

  8. कोविडच्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट बाळगणेही बंधनकारक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com