जळगाव : एरंडोल वनक्षेत्रात नीलगायीची शिकार

स्फोटकाचे गोळे पेरून शिकार केल्याचा संशय
Nilgai hunting in Erandol forest jalgaon
Nilgai hunting in Erandol forest jalgaonsakal

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरातील एरंडोल वनक्षेत्र हनुमान खोरे भागात नीलगायींचा कळप अनेक वर्षानंतर मुक्त संचार करताना दिसून येत आहे. बिबटचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर या भागाकडे शिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून आपली वक्रदृष्टी वळवली असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. रविवारी (ता. ३०) सकाळी शिकाऱ्यांनी नीलगायीची बॉम्बगोळे पेरून शिकार केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच वन्यजीव प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Nilgai hunting in Erandol forest jalgaon
कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष

रविवारी सकाळी वन्यजीव संरक्षण संस्था सदस्य अरुण सपकाळे, विद्यापीठ कर्मचारी अरण्यवाचन करत असतानाच त्यांना हनुमान खोरे भागाच्या वरील बाजूस असलेल्या झाडीत एक नीलगाय मृतावस्थेत आढळून आली. निरीक्षण केले असता तिचा जबडा फाटला असल्याचे दिसून आले त्यांनी तात्काळ मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे स्वयंसेवक बाळकृष्ण देवरे यांना माहिती दिली. सुरक्षा अधिकारी शेखर बोरसे, सुरक्षा रक्षक विनोद पाटील यांना सोबत घेत घटनास्थळी भेट देत निरीक्षण केले. त्यात नीलगायीचा तरुण नर मृत अवस्थेत पडून असलेला दिसून आला. त्याचा पूर्ण जबडा तुटलेला होता. काही दात देखील तुटले होते एकंदरीत स्फोटक असलेला गोळा खांल्याने त्या गोळ्यांचा तोंडात स्फोट झाला. त्यात हा नर एक, दोन दिवसांपूर्वी मारला गेला असल्याचा प्राथमिक निष्कर्ष रवींद्र फालक यांनी वर्तविला. वन्यजीव संरक्षण संस्थेचे अरूण सपकाळे यांनी या परिसरात इतर भागात शोध घेतला, परंतु फासे किंवा शिकारीचे इतर साहित्य आढळून आले नाही. फालक यांनी उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांना कळवले. त्यांच्या आदेशाने एरंडोल वनविभागाचे आरएफओ लोंढे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भालेराव, वनपाल ठाकरे, शिवाजी माळी, लखन लोंकलकर, शरद पाटील, कांतिलाल पाटील, विद्यापीठाचे शेखर बोरसे सुरक्षा अधिकारी, विनोद पाटील व सुरक्षा सुपरवायझर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

Nilgai hunting in Erandol forest jalgaon
"राहुल गांधी हे फेक गांधी, भाजपचं करतंय महात्मा गांधींच स्वप्न पूर्ण"

जनजागृती करणार

फासे लावून रानडुक्कर, ससे, मोर यांची शिकार करणारे आता सर्रास बॉम्बचा वापर करू लागल्याने ही भविष्यातील मोठ्या धोक्याची नांदी आहे. यावर वेळीच यावर घालणे गरजेचे आहे. शेतकरी, गुरे चारणाऱ्यांना भेटून त्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देणार असल्याचे वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे (दिल्ली) बाळकृष्ण देवरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com