NMU Vidya Parishad Meeting : ‘पीजी’साठी प्रत्येक विषयाला 2 शिक्षक अनिवार्य! विद्या परिषदेत निर्णय

NMU News
NMU Newsesakal

NMU Vidya Parishad Meeting : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित ज्या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जातात त्या महाविद्यालयांमध्ये प्रत्येक विषयांसाठी कमीत कमी दोन नियमित शिक्षकांची नियुक्ती बंधनकारक करण्याचा निर्णय विद्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. (NMU Vidya Parishad Meeting 2 teachers mandatory for each subject for PG Decision in Vidya Parishad jalgaon news)

विद्या परिषदेची सभा विद्यापीठाच्या अधिसभागृहात झाली. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे व कुलसचिव डॉ. विनोद पाटील उपस्थित होते. बैठकीत विविध ४८ विषयांवर चर्चा झाली.

पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांमध्ये विद्यापीठ मान्य ४१५ (१) नुसार कमीत कमी प्रत्येक विषयांसाठी दोन शिक्षकांची किंवा ५० टक्के शिक्षकांची नियुक्ती करणे बंधनकारक करण्याच्या विषयावर बैठकीत चर्चा झाली.

अनेक महाविद्यालयांमध्ये या प्रकारची शिक्षकांची नियुक्ती केली नसल्याचे दिसून येते. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी प्राध्यापक मिळत नाही आणि निकालाला उशीर होतो.

पर्यायाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे येत्या नव्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांमध्ये दोन शिक्षकांची किंवा ५० टक्के शिक्षकांची नियुक्ती बंधनकारक राहील, असे कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

NMU News
Nashik News : पदवीधर प्राथमिक शिक्षकांवर अन्याय; सातव्या वेतन आयोगात तफावतीमुळे नाराजी

या विषयांचे आता मराठीतून शिक्षण

विद्यापीठाच्या प्रशाळांमध्ये एम. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स, एम. ए. भूगोल, एम. एस्सी. मॅथेमॅटिक्स, एम. एड. आणि बी.बी.ए. या अभ्यासक्रमांसाठी इंग्रजीसोबतच मराठी भाषेतूनही शिक्षण देण्याचा निर्णय विद्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

उच्चशिक्षण क्षेत्रातील शिखर संस्थांनी स्थानिक मातृभाषेत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जावे, असा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी प्रा. सतीश कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली दुहेरी भाषेतून विद्यापीठ प्रशाळांमध्ये शिक्षण देण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यासाठी समिती नेमली होती.

त्यानुसार विद्यापीठ प्रशाळांमधील वरील अभ्यासक्रमांसाठी आता इंग्रजीसोबतच मराठीतूनही विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. क्रमिक पुस्तके मराठीत तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. दुहेरी भाषेतून शिक्षण देण्यासाठी त्या-त्या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असलेल्या एकूण जागांच्या २० टक्के जागांवर विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश दिला जाणार आहे.

NMU News
Onion Crisis : अवघ्या 10 दिवसांत सडला भिजलेला कांदा; JCBच्या सहाय्याने उकिरड्यात गाडण्याची वेळ

बी.एस्सी. कॉम्प्युटर, बी.ए. अर्थशास्त्रास मान्यता

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेत बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स आणि सामाजिकशास्त्र प्रशाळेत बी.ए. अर्थशास्त्र हे चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.

विद्यापीठातील शिक्षणशास्त्र प्रशाळेचे नाव बदलून आंतर विद्याशाखीय अभ्यास प्रशाळा, असे करण्यासही मान्यता देण्यात आली. विद्यापीठाच्या बहिःस्थ विभागाद्वारे विविध अभ्यासक्रम राबविले जातात.

आता या विभागाद्वारे सुरू असलेली शैक्षणिक व प्रशासकीय कार्यप्रणाली ही आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत विलीन करण्यास विद्या परिषदेने मान्यता दिली. शिवाय बैठकीत नवीन शैक्षणिक धोरणावर सदस्यांनी चर्चा केली.

विविध विषयांवरील चर्चेत अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य एस. एस. राजपूत, प्राचार्य अशोक खैरनार, प्रा. एस. टी. भूकन, प्राचार्य अरविंद चौधरी, प्राचार्य मिलिंद बिल्दीकर, प्राचार्य गौरी राणे,

डॉ. शिल्पा बेंडाळे, डॉ. केतन नारखेडे, डॉ. राहुल कुलकर्णी, प्रा. संजयकुमार शर्मा, प्रा. भूपेंद्र केसूर, प्रा. प्रशांत देशमुख, डॉ. एस. आर. सुरळकर, डॉ. गुणवंत सोनवणे आदींनी सहभाग घेतला.

NMU News
Nashik News : मालेगावातील उद्याने भकास, बालके उदास! सोयगावातील उद्यानांची दुरवस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com