रावेर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांअभावी रुग्णांचे हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

doctor

रावेर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांअभावी रुग्णांचे हाल

रावेर (जि. जळगाव) : येथील ग्रामीण रुग्णालयात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे उपचारादरम्यान हाल होत आहेत तर मृत्यूनंतर देखील शवविच्छेदन करण्यासाठी मुक्ताईनगर जावे लागत असल्याने मृतदेहाचीही हेळसांड होत आहे.

येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. एन. डी. महाजन यांच्या बदलीनंतर येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी मिळालेला नाही. आरोग्य विभागातच वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे सांगितले जाते. या पदाची नवीन भरती प्रक्रिया सुरू आहे, ती पूर्ण झाल्यावर हा प्रश्न सुटणार आहे. मात्र, तोपर्यंत येथील रुग्णांचे हाल होत आहेत. सध्या या रुग्णालयात शालेय आरोग्य तपासणी पथकातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स दैनंदिन रुग्णतपासणी करीत आहेत. सामान्य रुग्णांवर हे कनिष्ठ व सहकारी डॉक्टर्स, नर्स उपचार करतात. मात्र गंभीर रुग्ण आल्यावर मुक्ताईनगर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जातो व त्यांच्या निर्देशानुसार उपचार केले जातात.

हेही वाचा: वाहतूक पोलिसांना कंबरदुखी, गुडघेदुखी, फ्रोज शोल्डरचा त्रास

अपघात, विषप्राशन करून किंवा संशयास्पद मृत्यू झाल्यास शवविच्छेदन करावे लागते. त्यासाठी मृतदेह मुक्ताईनगरला न्यावा लागतो. रावेर येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी मिळावा म्हणून आमदार शिरीष चौधरीही वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांशी संपर्क साधून आहेत. जिल्ह्यात एक जरी नवे वैद्यकीय अधिकारी मिळाले तरी त्यांची नियुक्ती रावेर येथे करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होताच सर्वप्रथम रावेर येथे देण्यात येईल.

हेही वाचा: ''कोणाच्या गाडीवर पाहीले'' विचारल्याचा आला राग; विवाहितेस मारहाण

Web Title: No Doctor In Raver Rural Hospital Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaondoctor
go to top