Jalgaon News : मोदींविषयी आक्षेपार्ह विधान; BJPतर्फे जोडामारो आंदोलन

Officials of BJP and Minority Morcha protesting at Chhatrapati Shivaji Maharaj Chowk in the city.
Officials of BJP and Minority Morcha protesting at Chhatrapati Shivaji Maharaj Chowk in the city.esaka

चाळीसगाव (जि. नाशिक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शहरात भाजप आक्रमक झाले असून, शनिवारी (ता.१७) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडामारो आंदोलन करीत निषेध नोंदविण्यात आला. (Offensive statement about PM Modi Jodamaro movement by BJP Jalgaon News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Officials of BJP and Minority Morcha protesting at Chhatrapati Shivaji Maharaj Chowk in the city.
Samruddhi Highway Ride : समृद्धी महामार्गावरून निघालात? अशी घ्या टायरची काळजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांनी अश्लील विधान केले. त्यानंतर याचे पडसाद देशभरात उमटले असून, बिलावल झरदारी व पाकिस्तानविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथे शनिवारी भाजप व अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने झरदारी यांचा पुतळा जाळला व प्रतिमेला जोडामारो आंदोलन करण्यात आले.

या वेळी पाकिस्तान मुर्दाबाद यांच्यासह विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. तत्पूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध नोंदविण्यात आला. या जोडामारो आंदोलनात भाजप जिल्हा उपाध्यक्ष के. बी. साळुंखे, ज्येष्ठ नेते उद्धवराव महाजन, तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांच्यासह भाजपसह अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Officials of BJP and Minority Morcha protesting at Chhatrapati Shivaji Maharaj Chowk in the city.
Nashik Political News : नाशिकचा विकास नव्हे, वैयक्तिक विकासाचे मॉडेल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com