Latest Marathi News | रस्त्यात अडथळा ठरणारी जुनी भिंत पाडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon: Officials of Municipal Encroachment Department while demolishing a wall obstructing the road in Pimprala

Jalgaon News : रस्त्यात अडथळा ठरणारी जुनी भिंत पाडली

जळगाव : शहरातील महामार्गालगत असलेल्या फोकस ह्युंदाईच्या शोरूमपासून ते पिंप्राळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून एक भिंत बांधली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत होता. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने ही भिंत पाडण्याची कारवाई केली. त्यामुळे आता रस्ता मोकळा झाला आहे.

शहरातील महामार्गापासून पिंप्राळा भागातील मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या भागात एका घराची वालकंपाउंड गेल्या अनेक वर्षांपासून बांधली होती. त्यामुळे नागरिकांना पिंप्राळ्याकडे जाण्याचा रस्ता बंद झाला होता. या भिंतीमुळे पिंप्राळ्यातील नागरिकांना महामार्गावरून पिंप्राळा गावाकडे येण्यासाठी किंवा पिंप्राळ्यातून महामार्गावर जाण्यासाठी अडथळा निर्माण होत होता.

(old wall blocking road demolished encroachment removal department of municipal corporation took action Jalgaon News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Crime News : वाळू माफियावर कारवाई; ६५ लाखांचा साठा जप्त

त्यासाठी मोठ्या फेऱ्याने जावे लागत होते. स्थानिक नागरिकांनी ही भिंत काढण्याची मागणी अनेकवेळा महापालिकेकडे केली होती. मात्र, महापालिका अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला होता.

नागरिकांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेऊन उपमहापौरांनी नगररचना विभागास त्याबाबत माहिती घेण्याचे, तसेच कार्यवाही करण्याबाबत सुचविले. त्यानंतर नगररचना विभागाने त्याबाबत कागदपत्रे तपासून ही अतिक्रमित भिंत असल्याचे जाहीर केले व महापालिकेच्या अतिक्रमण विभागास ती भिंत काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी (ता. ३०) महापालिकेचे नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमण निर्मूलन विभागाने भिंत तोडली.

हेही वाचा: Satara News : खोकी, हातगाड्यांवर पालिका ‘मेहरबान’