Latest Marathi News | जळगाव : उपचारादरम्यान ‘त्या’ मयत वृद्धेची पटली ओळख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

woman death

जळगाव : उपचारादरम्यान ‘त्या’ मयत वृद्धेची पटली ओळख

जळगाव : जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनोळखी महिलेचा शनिवारी (ता. १६) सकाळी ६ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. पोलिसांनी अखेर तिची ओळख पटवली असून मीनाबाई अरूण तायडे (वय ४५, रा. पिंप्री सेकम दीपनगर, ता. भुसावळ) असे मृत महिलेचे नाव आहे. (Latest Marathi News)

हेही वाचा: पोलिस विभागात चहापेक्षा किटली गरमचा अनुभव; हजेरीमास्तरची कर्मचाऱ्याला दमबाजी

गेल्या महिन्यात १७ जूनला भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे अनोळखी महिला बेवारसरीत्या आढळून आली होती. त्यामुळे महिलेला शासकीय रुग्णालयातून जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान शनिवारी सकाळी ६ वाजता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती.

हेही वाचा: मुलाला साहेब झालेला पाहण्याचे स्वप्न मात्र तिचे कायमचेच विरले...

मयत महिलेची ओळख पटविण्यासाठी रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विजय खैरे, पोलिस नाईक रेवानंद साळुंखे, नीलेश पाटील, पंकज पाटील, अजय सपकाळे यांनी तपासाची चक्रे फिरवून १२ तासात ओळख पटविली. मीनाबाई अरूण तायडे असे मृत महिलेचे नाव निष्पन्न झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: Old Woman Who Died During Treatment Was Identified Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonDeath Of Woman
go to top