वाहतूक बेट सुशोभीकरणाला प्रतिसाद; 4 लाख रॉयल्टीसह 8 विकासक आले पुढे

traffic square
traffic squareesakal

नाशिक : महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांनी १३२ वाहतूक बेटाच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेतला आहे. सामाजिक दायित्व निधीतून प्रायोजक संस्थांना आवाहन केले होते. यास प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच आठवड्यात शहरातील आठ विकासकांनी वाहतूक बेट सुशोभीकरणाला प्रतिसाद नोंदविला आहे. (Developers response to Traffic square beautification Nashik News)

महापालिका शहरातील रस्ते दुभाजक व वाहतूक बेटाच्या जागा प्रायोजकांना प्रायोगिक तत्त्वावर देणार असून, त्यापैकी आठ विकसकांनी रॉयल्टी (Royalty) भरण्याची तयारी दाखविल्याने त्यांना ही वाहतूक बेटे व रस्त्याची दुभाजकाच्या जागा देण्याचे नियोजन सुरू आहे. महापालिकेने प्रायोजकांच्या मदतीने शहरातील वाहतूक बेटांसह रस्ता दुभाजकाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रायोजकांना आवाहन केले. त्यानुसार पहिल्याच आठवड्यात शहरात ८ प्रायोजक संस्थांनी प्रतिसाद देत रॉयल्टी भरून वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करण्याला प्रतिसाद नोंदविला आहे.

traffic square
Summer Holiday : उन्हाळी सुट्टीमुळे पर्यटनाला चालना

त्यापोटी सुमारे ४ लाखांची रॉयल्टी भरीत आठ चौकात नव्याने वाहतूक बेटाच्या सुशोभीकरणाची निर्णय घेतला आहे. आर्कषक सुशोभीकरणासह संबंधित वाहतूक बेटांचे देखभाल प्रायोजक कंपन्याच करणार आहेत. त्या बदल्यात उलट नाशिक महापालिकेला रॉयल्टी स्वरूपात महसूल मिळणार आहे. नाशिक रोडला दत्तमंदिर चौकात दोन्ही बाजूच्या वाहतूक बेटाच्या विकासासाठी प्रायोजकांनी प्रतिवर्ष १ लाख रुपये रॉयल्टी दिली आहे. तसेच जेल रोड भागातील रस्ता दुभाजक विकसित करण्यासाठी ५० हजार रुपये, सातपूर येथील सर्व्हे नंबर १०० मधील वाहतूक बेट व चौक सुशोभीकरण करण्यासाठी ३५ हजार रुपये महापालिकेला मिळाले आहेत.

traffic square
Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात 6 शेळ्या ठार

पाथर्डी फाटा जवळील मॅकडोनाल्ड समोरील रस्त्याच्या कोपऱ्यावर वाहतूक बेट व चौक सुशोभीकरण करण्यासाठी ५० हजार रुपये, रविवार कारंजावर वाहतूक बेट विकसित करण्यासाठी ३१ हजार रुपये, संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांचा पुतळा व वाहतूक बेटे विकसित करण्यासाठी ३१ हजार रुपये प्रतिवर्ष मनपाला मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com