Jalgaon Crime News : व्यापाऱ्यास गंडविल्याप्रकरणी मुंबईतून एकाला अटक

Crime news
Crime newsesakal

Jalgaon Crime News : बांधकामास लागणारे स्टिल मटेरियल पाठवितो, असे सांगून रावेरच्या एका व्यापाऱ्याला १६ लाखांत ऑनलाईन गंडविले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले होते.

मात्र, गुन्ह्यातील मास्टरमाईंड भामट्याला सायबर पोलिसांनी मुंबई येथून अटक केली. (One arrested from Mumbai in case of cheating businessman Jalgaon Crime News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Crime news
Dhule Crime News : धुळ्यात कनिष्ठ सहाय्यक अटकेत; पंचायत समिती शाखा अभियंत्याकडेच लाच मागितली

याबाबत रावेर तालुक्यातील गजानननगरमधील व्यापरी मोहनलाल देवजी पटेल (वय ६०) यांनी जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती. मोहनलाल पटेल यांना संशयित ललितकुमार तुलसीराम खंडेलवाल (वय ३८, रा. छिपावली, ता.जि. सिरोही, राजस्थान) याने फोनवरून ‘आमची आयएसओ टॉप्स इंडिया मेटल ट्रेडर्स’ नावाची कंपनी आहे.

आम्ही तुम्हाला बांधकामासाठी लागणारे स्टिल मटेरियल पुरवितो, असे सांगत विश्वास संपादन केला. त्यांना टॅक्स इन्व्हॉईस व बनावट ई-बिल पाठवून त्यांच्याकडून वेळोवेळी १६ लाख २७ हजार ८०० रुपये उकळून ऑनलाईन फसवणूक केली.

१९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान हा गुन्हा घडला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर १५ मार्चला संशयित ललितकुमार खंडेलवाल याला सायबर पोलिसांनी सुरतमधून अटक केली होती.

दुसरा मुंबईतून अटकेत

या प्रकरणातील दुसरा संशयित मोहंमद आफताब असगर अली (वय ४३, साकीनाका, मुंबई) हा निष्पन्न झाला होता. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर, कर्मचारी श्रीकांत चव्हाण, वसंत बेलदार, ललित नारखेडे आदींनी गेल्या पाच महिन्यांपासून तांत्रिक तपासाच्या अधारे शोध घेत रविवारी (ता. ७) रात्री आठच्या सुमारास त्याला मुंबई येथून अटक केली. त्याची कसून तपासणी केली जात आहे.

Crime news
Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षांची शिक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com