Jalgaon State Chess Tournament : जळगावात या तारखेला राज्‍यस्‍तरीय बुद्धिबळ स्‍पर्धेचे आयोजन

chess tournament
chess tournament sakal

Jalgaon State Chess Tournament : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटने प्रायोजित केलेली स्‍पर्धा जळगाव जिल्ह्यातील पहिलीच क्लासिकल प्रकारातील फिडे मानांकन आहे. स्‍पर्धा एकूण आठ फेऱ्यामध्ये स्वीस साखळी पद्धतीने खेळवली जाणार आहे.

स्‍पर्धेत २० जिल्‍ह्यांतून खेळाडू सहभागी होत आहेत. त्‍यांच्‍या निवासाची मोफत व्यवस्था महाविद्यालयात आहे. (Organization of state level chess competition in Jalgaon news)

रायसोनी महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, जैन स्पोर्ट ॲकॅडमीचे रवींद्र धर्माधिकारी व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच प्रवीण ठाकरे उपस्थित होते.

अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने जळगाव शहरात जी. एच. रायसोनी मेमोरियल खुल्या महाराष्ट्र राज्य निवड गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा महाविद्यालयाच्‍या सेमिनार हॉलमध्‍ये २० ते २३ जुलैदरम्यान होणार आहे, अशी माहिती रायसोनी इन्स्टिट्यूटचे संचालक प्रीतम रायसोनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

chess tournament
Chess : नागपूरचा वैभव आई-वडिलांपासून प्रेरणा घेत बनला आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू

खुल्‍या गटातील स्पर्धेतील विजेत्यांना ७२ हजार रुपयांचे रोख बक्षीस व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेतून पहिल्या येणाऱ्या चार खेळाडूंची निवड ६० व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात होणार आहे. राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा पुणे येथे १६ ते २७ ऑगस्टदरम्यान होणार आहे.

chess tournament
World Chess Championship 2023 : चॅम्पियन मॅग्नस कार्लसन विश्वविजेतेपद सोडणार; नवा विश्वविजेता कोण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com