
Jalgaon Marathi Sahitya Sammelan : जामनेर तालुका साहित्य, सांस्कृतिक मंडळातर्फे १४ वे खानदेशस्तरीय मराठी साहित्य संमेलन रविवारी (ता. ७) (स्व.) पद्मश्री ना. धों. महानोर साहित्य नगरी एकलव्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर, जळगाव रोड, जामनेर येथे आयोजित करण्यात आले आहे.
या साहित्य संमेलनात कवी, गीतकार, लेखक, अभिनेता, असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले नाशिक येथील अजय बिरारी अध्यक्षस्थानी असतील तर ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.(Organized Khandesh level Marathi sahitya sammelan at Jamner on Sunday jalgaon news)
माजी नगराध्यक्षा साधना महाजन स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डी. डी. पाटील यांनी जामनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. डी. डी. पाटील म्हणाले, की सकाळी दहा ते अकरा उद्घाटन समारंभ, अकरा ते बारा कथाकथन होईल. यासाठी राहुल निकम (जळगाव) हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
रमेश बनकर (पहूर), डॉ. संगीता गावंडे (जामनेर) यांचा सहभाग या सत्रामध्ये राहणार आहे. दुपारी बारा ते साडेबारापर्यंत भोजन व्यवस्था असून, दुपारी एक ते तीन या दुसऱ्या सत्रामध्ये निमंत्रित कवी संमेलन ठेवण्यात आलेले आहे. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक व साहित्यिक बी. एन. चौधरी (धरणगाव), तसेच मधु पांढरे उपस्थित राहणार आहेत.
या कवी संमेलनात खान्देश विभागीय कविवर्य उपस्थित राहणार असून, आपल्या कविता सादर करणार आहेत. तिसऱ्या सत्रात बक्षीस वितरण व सत्कार सोहळा होणार आहे. विजय सूर्यवंशी, श्रीकांत पाटील, शंकर भामरे, प्रतिभा चौधरी हे संमेलनाचे सूत्रसंचालन करतील. संमेलन सर्वांसाठी खुले आहे.
संमेलन अगदी वेळेवर सुरू होणार आहे. तरी सर्व साहित्यिक, कवी व मान्यवरांनी संमेलनास वेळेवर उपस्थिती द्यावी, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष डी. डी. पाटील, उपाध्यक्ष मधुकर पांढरे, सचिव गोरख सूर्यवंशी, सहसचिव जितेंद्र गोरे, खजिनदार सुखदेव महाजन व संचालक मंडळाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.