Jalgaon : जामनेरमधील 29 गावांत दोन हजारांवर शेततळी

farm pond
farm pondesakal

जळगाव : वाघूर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील जामनेर तालुक्यातील २९ गावांमध्ये जलसंपदा विभाग व कृषी विभागाने २०२० शेततळे बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. २९) वाघूर उपसा सिंचन योजनेच्या (Waghur Upsa Irrigation Scheme) लाभक्षेत्रात जलसंपदा विभाग व कृषी विभागातर्फे शेततळे (Farm pond) उभारण्याबाबत बैठक झाली. (Over 2000 Farm ponds in 29 villages of Jamner will construct jalgaon news)

जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता य. का. भदाणे, कृषी विभागाचे संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाघूर प्रकल्पाचे अभियंता विनोद पाटील व अधिकारी उपस्थित होते. वाघूर प्रकल्पाच्या सातव्या सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालानुसार जामनेर तालुक्यातील वाघूर प्रकल्पाच्या २९ गावांतील लाभक्षेत्रात एकूण २०२० शेततळे बांधणे प्रस्तावित आहे. शेततळे तयार करणे व शेततळ्यातून सूक्ष्म सिंचन, पाणीवापराबाबत शेतकऱ्यांसोबत करार करण्याची कार्यवाही प्रगतिपथावर आहे.

ही कामे या वर्षात सुरू करण्याचे नियोजन आहे. शेततळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवे त्या वेळी पाणी मिळणार आहे. त्यामुळे शेती उत्पादनवाढीस मदत होईल, तसेच शेततळ्यामध्ये मत्सउत्पादन, शेततळ्याच्या बांधावर फळ वृक्षलागवड व सौरऊर्जानिर्मिती, अशा विविध बाबींचा अंतर्भाव करून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी मदत होणार आहे.

farm pond
नाशिकचा आगामी पालकमंत्री कोण?

साधारण पाच हेक्टर क्षेत्रात एक शेततळे (१६ गुंठे आकाराचे). त्यात २७ लाख लिटर पाणीसाठा व तो दर २५ दिवसांनी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे शेततळे भरून देण्याचे नियोजन राहणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

farm pond
Nashik : सोशल मीडियावर बदनामी करून खंडणीची मागणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com