
कट लागल्याचे कारण उरकून काढत त्यांनी भूषणशी पुन्हा वाद घालून मारहाण सुरू केली.
दुचाकीला कट मारल्याचा किरकोळ वाद; तरुणाचा भोकसून निघृण खून
पाचोरा - पाचोरा येथे तरूणाईच्या गँगवार बाबतच्या घटना सुरु असताना रविवारी (30) दुचाकीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून 23 वर्षीय डिप्लोमा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या युवकाचा निर्घुण खून झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून पाचजणांना रात्री उशिरापर्यंत ताब्यात घेतले आहे. या धक्कादायक घटनेमुळे सारे गाव सुन्न झाले आहे.
पूनगांव रोड भागातील दुर्गा नगरात भूषण नाना शेवरे (वय 23) राहत होता. रविवार दुपारी भडगाव रोड भागातील साई मंदिराजवळ समोरासमोर दुचाकीला कट मारल्याची घटना घडली होती. त्यामुळे त्याचा युवकांमध्ये वाद झाला. तो वाद उपस्थितांनी मिटवला. ज्या लोकेश (विकी) नामक युवकाशी भूषणचा वाद झाला होता त्याने भुषणला सायंकाळी पुनगाव रोड भागातील बुर्हानी इंग्लिश मीडियम स्कूलच्या परिसरात बोलावले. तेथे लोकेश सोबत आठ ते दहा युवक होते.
हेही वाचा: सांगलीत 'पुष्पा'चा पर्दाफाश; करत होते रक्तचंदनाची तस्करी
कट लागल्याचे कारण उरकून काढत त्यांनी भूषणशी पुन्हा वाद घालून मारहाण सुरू केली. वाद सुरू असताना लोकेशने धारदार हत्यार भुषणच्या पोटात खूपसल्याने तो जमिनीवर कोसळला. यानंतर भूषणला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यास जळगावला हलवण्याचा सल्ला दिला. मात्र उपचार सुरु असतानाच भूषणचा मृत्यू झाला. मारहाणीची घटना घडल्यानंतर मुख्य संशयित लोकेश हा स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला असून मारामारी झाल्याचे पोलिसांना सांगितले होते. दरम्यान, भुषणचा मृत्यु झाल्याचे कळताच शेवरे कुटुंबीयांनी आक्रोश केला.
हेही वाचा: इन्स्टाग्रामवर तरुणींना फसवणारा वसईचा ब्लॅकमेलर अखेर जेरबंद
दोन युवकांच्या वादातून खुनाची घटना घडल्याने शहराच्या काही भागात पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला. पोलिसांनी रविवारी रात्रीच आठ संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवून लोकेशसह 8 जणांना ताब्यात घेतले. उर्वरित फरार असलेल्या तिघांचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान भूषणचा मृतदेह पाचोरा येथे आणण्यात आला. दुचाकीला कट मारण्याचे कारण या खुनाच्या घटनेमागे असल्याचे सांगितले असले तरीही यामागे इतरही वेगळे कारण असू शकते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे या खुनामागील सत्य बाहेर आणावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Web Title: Overcut To Two Wheeler In Jalgaon One Murders 5 People Police Custody
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..