सांगलीत 'पुष्पा'चा पर्दाफाश; करत होते रक्तचंदनाची तस्करी I Sangli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

सांगलीत 'पुष्पा'चा पर्दाफाश; करत होते रक्तचंदनाची तस्करी

नुकताच चित्रपटगृहात आलेला तमिळ चित्रपट 'पुष्पा' सध्या सुपरहिट ठरला आहे. चंदनाची तस्करी हा या चित्रपटाचा मुळ विषय आहे. परंतु याच चित्रपटाची पुनरावृत्ती आज सांगलीत घडली आहे. सांगली परिसरात रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल अडीच कोटीचे चंदन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या चंदनतस्करीचे रॅकेट कर्नाटकात असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, सर्व यंत्रणा चकवा देत मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी करणार पुष्पा चित्रपटातील हिरोसह तो चित्रपटही सध्या खूप चर्चेत आहे. याचीच प्रचिती येत आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करी होत असलेल्या दोन कोटी 45 लाख 85 हजाराचे 983 किलो 400 ग्रॅम रक्तचंदनावर मिरजेत पोलिस आणि वन विभागाने धाड टाकून पकडले. पोलिस विभागाने हे चंदन मोठ्या शिताफीने पकडले आहे. यावेळी यासिन इनायतउल्ला खान (रा. अनेकळ, जि. बंगलुरु) याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा: भाजपने उमेदवारांची नावं जाहीर करताच इच्छुकांचे दिले राजीनामे

आंध्र प्रदेश मधील जंगलातून मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी कशी केली जाते यावर प्रकाश टाकणारा चित्रपट पुष्पा नुकताच प्रदर्शित झाला आहे. अशाचप्रकारे रक्तचंदन महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपाधिक्षक अशोक विरकर आणि सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने वन विभागाच्या सहाय्याने चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रविवारी पहाटे तस्करी होत असलेले रक्तचंदन मिरजेतून जाणार असल्याची माहिती रविराज फडणीस यांना मिळाली.

वाइन उद्योगाबद्दल राऊत यांना ज्ञान आहे का? सोमय्यांचा उपरोधिक टोलादरम्यान, पोलिसांनी मिरज-कोल्हापूर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास सापळा लावला. कोल्हापूर जकात नाका येथे उड्डाणपूल येथून वाहतूक होत असल्याचा फलक लावून जाणारा KA 13 6900 हा टेम्पो पोलिसांना आढळून आले. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये 2 कोटी 85 लाखाचे 983 किलो 400 ग्रॅम चंदन असल्याचे निदर्शनास आले. ते जप्त करण्यात आले असून या तस्करीचा संबध थेट कर्नाटकशी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हे रक्त चंदन नेमके आले तरी कुठून याचा तपास सांगली पोलिस करत आहेत.

हेही वाचा: वाइन उद्योगाबद्दल राऊत यांना ज्ञान आहे का? सोमय्यांचा उपरोधिक टोला

Web Title: Blood Sandalwood Smuggling Gang Busted In Sangli From Karnataka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top