
इन्स्टाग्रामवर तरुणींना फसवणारा वसईचा ब्लॅकमेलर अखेर जेरबंद
वसई: मुलींना इन्स्टाग्रामवर (Instagram) मॉडेल बनवण्याची आॅफर देणाऱ्या अबू सलीम रेहमान अन्सारी (१९) याला आज वसई पोलिसांनी (Vasai Police)अटक केली.आतापर्यंत त्याने ७ मुलींना अशाप्रकारे जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे. वसईत राहणार्या २३ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आज पोलीसांनी फिल्मी स्टाईलने त्याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार,
आरोपी अबू सलीम हा साराह वर्मा (Sarah vermaa) या नावावरून इन्स्टाग्रामवरून मुलींशी संपर्क करायचा आणि मॉडेलिंगची ऑफर द्यायचा. त्यानंतर प्युमा (Puma) कंपनीचा अधिकारी हर्ष बनून तो मुलींशी बोलायचा. त्याचे इंग्रजी चांगले असल्याने त्याच्या बोलण्याला मुली फसायच्या. वसईत राहणार्या २३ वर्षीय तरुणीला त्याने ५ हजार रुपये घेऊन लॉजवर बोलावले होते. त्यासाठी कॅब बुक केली होती. पोलिसांनी कॅब चालक बनून सापळा लावला आणि गोखिवरे येथून त्याला अटक केली.
अबू सलीम रेहमान अन्सारी हा तरुण वसईत (Vasai) राहतो. त्याने मुलींना ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्यासाठी इन्स्टाग्रामवर नव्या चेहर्यांची गरज आहे असे सांगून मॉडेलिंगची (Modeling) ऑफर द्यायचा. प्रसिध्दी आणि पैसा याला भूलून या मुली तयार व्हायच्या. मग या मुलींशी व्हॉटसॲप चॅट (Whatsapp Chat) करायचा. त्यांना अश्लील चॅट (सेक्स चॅट) करण्यास उद्युक्त करायचा आणि त्याचे रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल करायचा. पैसे दिले नाहीत तर या अश्लील चित्रफिती वायरल करायच्या धमकी देऊन पैसे आणि एक रात्र सोबत घालविण्याची मागणी करायचा. वसईत राहणार्या २३ वर्षीय तरुणीला त्याने अशाच प्रकारे आपल्या जाळ्यात ओढले होते. या तरुणीने वसई पोलीस ठाण्यात (Vasai Police Station) तक्रार दिली होती. त्या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला अटक केली.
Web Title: Abu Ansari Aressted In Vasi Police Instagram Blackmail Crime Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..