Pachora Bazar Samiti Election : पाचोरा बाजार समिती त्रिशंकू, आमदारांना सर्वाधिक जागा

market committee election
market committee election esakal

Pachora Bazar Samiti Election : पाचोरा - भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठीच्या मतदानाची मतमोजणी रविवारी उशिरापर्यंत पार पडली.

यात शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी १८ पैकी ९ जागा पटकावून आपला गड कायम राखला असला तरी महाविकास आघाडीने ७ व भाजप प्रणित पॅनल २ जागा मिळवल्याने बाजार समितीची स्थिती त्रिशंकू झाली आहे.

आमदार किशोर पाटील यांना बहुमतासाठी अवघे एक मत गरजेचे असून, महाविकास आघाडी व भाजप एकत्र आले तरी त्यांची संख्या ९ होते. त्यामुळे आता सभापती, उपसभापती निवडीकडे लक्ष लागून आहे. (Pachora Bazar Samiti Election MLA most seat jalgaon news)

बाजार समितीच्या सर्वसाधारण मतदारसंघाच्या ११, ग्रामपंचायतीच्या ४, व्यापारी मतदारसंघाच्या २ व हमाल मापाडीची १ अशा १८ जागांसाठी ता २८ रोजी ९८.२२ टक्के मतदान झाले होते. त्याची मतमोजणी रविवारी रामदेव लॉन्स मंगल कार्यालयात झाली.

मतदान प्रक्रिया अत्यंत संथ गतीने चालल्याने सायंकाळी चारपर्यंत अंतिम निकाल हाती आले. पराभूत झालेल्या तीन उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केल्याने बराच वेळ वाद चालला. आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ हे मतमोजणी स्थळी आले.

परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व पराभूत उमेदवारांचे फेरमतमोजणीचे अर्ज नामंजूर केले. हा घोळ बराच वेळ चालला. त्यानंतर विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

market committee election
Market Committee Election Analysis : भाजपला अंतर्गत रस्सीखेच भोवली; आत्मपरीक्षणाची वेळ

मतदार संघनिहाय विजयी उमेदवार याप्रमाणे : सोसायटी सर्वसाधारण (७ जागा) गणेश पाटील, सतीश शिंदे, प्रशांत पवार, प्रकाश पाटील, श्‍यामकांत पाटील, मनोज महाजन, विजय पाटील. सोसायटी महिला राखीव (२ जागा) पूनम पाटील, सिंधूताई शिंदे.

सोसायटी इतर मागास (१ जागा) उद्धव मराठे. सोसायटी भटक्या विमुक्त जाती(१ जागा). लखीचंद पाटील. ग्रामपंचायत सर्वसाधारण (२ जागा) नीळकंठ पाटील, सुनील पाटील. ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती (१ जागा ) प्रकाश तांबे.

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल (१ जागा) राहुल पाटील. हमाल मापाडी मतदारसंघ (१ जागा) युसूफ पटेल. व्यापारी मतदारसंघ (२ जागा), मनोज सिसोदिया, राहुल संघवी. सर्वाधिक मते सोसायटी मतदारसंघात सेनेचे गणेश पाटील यांना मिळाली. सभापती व उपसभापती शिवसेना-भाजप युतीचेच होतील, असा विश्वास आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला.

market committee election
Labor Day: बाधितांचे कुटुंबीय आजही मदतीपासून वंचित; शिरपूरजवळील रूमित केमिकल्समधील स्फोटाला 4 वर्ष पूर्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com