Gulabrao Patil : आता ‘पद्मालय वनोद्यान’ मंजूर करणार - पालकमंत्री पाटील

Gulabrao Patil News
Gulabrao Patil Newsesakal

जळगाव : प्रधान सचिव (ग्रामविकास) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय समितीने पद्मालय देवस्थानास ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविक, यात्रेकरूंना विविध सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.

त्यासाठी पाच कोटींचा निधीचा प्रस्ताव सादर केला असून, वनक्षेत्रात पर्यटनस्थळांचा विकास योजनेंतर्गत जळगाव वन विभागांतर्गत एरंडोल वन परिक्षेत्रातील श्रीक्षेत्र पद्मालय परिसरात ‘पद्मालय वनोद्यान’चा कृती आराखडा शासनाच्या वन विभागाकडून लवकरच मंजूर करून आवश्यक निधी उपलब्ध करून देणार आहे.

Gulabrao Patil News
Jalgaon News : आंबेहोवळच्या शेतकऱ्यांची कापूस मोजणीत फसवणूक; कपाशीसहित ट्रक जप्त

आता ‘पद्मालय वनोद्यान’ मंजूर करावयाचे आहे. त्यासाठी लागणारा १० कोटी ९३ लाखांचा निधी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार चिमणराव पाटील यांचे सहकार्य घेऊन मंजूर करणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे दिली.

गणपती मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी राज्यस्तरीय समितीची मान्यता मिळाल्यानंतर रविवारी (ता. २५) देवस्थानचे पदाधिकारी व विश्वस्तांनी पालकमंत्री पाटील यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. विश्वस्त अशोक पाटील, डॉ. पिंगळे, भाऊसाहेब कोळी आदी उपस्थित होते.

Gulabrao Patil News
Jalgaon Municipal Corporation: जळगाव महापालिका संपूर्ण कर्जमुक्त; हुडकोच्या कर्जाचा भरला शेवटचा हप्ता

पालकमंत्री पाटील म्हणाले, की श्रीक्षेत्र पद्मालय रामायणकालीन पुरातन व प्राचीन मंदिर आहे. देवस्थान व परिसरातील भीमकुंड पर्यटकांचे आकर्षण ठिकाण आहे. हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे.

ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यात श्री गणपती देवस्थान, तरसोद, कण्वऋषी आश्रम, कानळदा येथील देवस्थानास ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रत्येकी ६ व ५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

Gulabrao Patil News
Jalgaon News : पुतळ्यांचे राजकारण नव्हे; जमिनीचे ‘अर्थ’कारण!

जिल्ह्याच्या दृष्टीने धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाचे महत्त्व असलेल्या पद्मालय देवस्थानाचा तीर्थस्थळाला ‘ब’ तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा द्यावा, यासाठी भाविकांसह परिसरातील नागरिकांची मागणी होती.

पालकमंत्री पाटील यांनी गेल्या एक ते दोन वर्षांपासून सतत पाठपुरावा केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री महाजन यांच्याशी चर्चा करून राज्यस्तरीय बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यासाठी साकडे घातले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com