Jalgaon News : पोलिस बनण्याचे स्वप्न राहिले अधुरे.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dead Roshan Pawar

Jalgaon News : पोलिस बनण्याचे स्वप्न राहिले अधुरे..

तोंडापूर (जि. जळगाव) : पोलिस (Police) भरतीसाठी पुणे येथे गेलेल्या पहूर (ता. जामनेर) येथील तरुणाला मैदानावरच अस्वस्थ वाटू लागल्याने घरी परतत असताना प्रकृती अधिकच

बिघडल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (Pahur youth who went for police recruitment dies while returning jalgaon news)

रोशन बहिरू पवार (वय २०) असे मृत तरुणाचे नाव असून, ही घटना मंगळवारी (ता. २१) दुपारी घडली.

पुणे येथे पोलिस भरतीसाठी सोमवारी (ता. २०) पहूर येथील रोशन बहिरू पवार हा गेला होता. भरती प्रकिया सुरू असताना मैदानावरच अचानक त्याची तब्येत बिघडली. पोलिसांनी त्याला दवाखान्यात नेऊन त्याच्यावर उपचार केले.

भरती प्रकिया आटोपून रात्रीच्या रेल्वेने पुण्याहुन भुसावळ येथे सकाळी पाचला पोचण्याअगोदर घरी फोन करून तब्येत चांगली नसल्याने त्याने सांगितले. त्यामुळे भुसावळ येथे नातेवाईकांच्यावतीने उपचार करण्यात आले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

फोनवर माहिती मिळताच आई, वडील, भाऊ यांनी भुसावळ येथून जामनेर येथे सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले पुन्हा अस्वस्थ वाटत असल्याने जामनेर येथील खासगी रूबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

बहिरू पवार यांना तीन मुले असून, मुलाचे पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण अधुरे राहिल्याचे सांगत वडिलांनी प्रचंड आक्रोश केला. मनमिळाऊ व हुशार तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबावर आभाळ कोसळले असून, गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Jalgaonpolicedeath