Latest Marathi News | यज्ञेशच्या उपचाराचा मार्ग मोकळा; पालकमंत्र्यांचा मदतीचा हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Minister Assistance Fund

Jalgaon : यज्ञेशच्या उपचाराचा मार्ग मोकळा; पालकमंत्र्यांचा मदतीचा हात

जळगाव : भोकर (ता. जळगाव) येथील सामान्य कुटुंबातील किरणकुमार पवार यांच्या सातवर्षीय यज्ञेशला फॅनकोनी ॲनेमिया म्हणजे शरीरात रक्त तयार न होणे हा आजार झाला होता. त्यामुळे त्याला तमिळनाडूतील सीएमसी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे. त्याच्या उपचारासाठी भोकर येथील सुभाष पाटील, प्रमोद सोनवणे, बालाशेठ, अरुण सोनवणे, पुंडलिक सोनवणे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मदतीसाठी साकडे घातले होते.

मंत्री पाटील यांनी तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सातवर्षीय यज्ञेशच्या उपचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन लाखांचा निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे यज्ञेशच्या उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पवार परिवाराला मोठा दिलासा मिळाला आहे.(Paving way for Yajnesha healing Helping hand of guardian minister Fund of two lakhs sanctioned through Chief Ministers Assistance Fund Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon : भाऊबीजेला बहिणीकडे गेलेल्या भावाचा बुडून मृत्यू

मुख्यमंत्री शिंदे यांनीही आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून गरीब रुग्णांसाठी आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात खुली करून दिली आहे. पूर्वी ज्या खर्चिक आजारांचा या योजनेत समावेश नव्हता त्या आजारांचा या योजनेत नव्याने समावेश करण्यात आला आहे.

प्रत्येक गरीब रुग्णाला चांगले उपचार मिळावेत हा या योजनेमागचा उद्देश असून, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. तसेच शासकीय आरोग्य यंत्रणा बळकट व सक्षम करून तेथेही गरजू व गरीब रुग्णांना चांगले उपचार मिळतील यासाठी स्वतः मुख्यमंत्री शिंदे लक्ष घालत आहेत. यासाठी आरोग्य विभागाला दुप्पट निधी देण्याची शासनाची भूमिका असून, महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवून जास्तीत जास्त रुग्णांना वेळेत व चांगले उपचार मिळावेत यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: Bhaubeej Special : राजकीय मतभेद,त्यापलिकडे नाते अभेद्य